Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी, वर्षभरात नफा २७ टक्क्यांनी वाढला

बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी, वर्षभरात नफा २७ टक्क्यांनी वाढला

सहा सरकारी बँकांचा शुद्ध नफा १० हजार कोटींपेक्षा अधिक, एनपीए कमी झाल्याने मिळाले बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 04:53 IST2025-05-12T04:53:32+5:302025-05-12T04:53:32+5:30

सहा सरकारी बँकांचा शुद्ध नफा १० हजार कोटींपेक्षा अधिक, एनपीए कमी झाल्याने मिळाले बळ

banks earned 1 lakh crore 79 thousand profit increased by 27 percent in the year | बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी, वर्षभरात नफा २७ टक्क्यांनी वाढला

बँकांनी कमावले १.७९ लाख कोटी, वर्षभरात नफा २७ टक्क्यांनी वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कमी झालेला एनपीए, व्यवहारांमध्ये वाढ याच्या बळावर सर्व १२ सरकारी बँकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये विक्रमी १.७९ लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यात २७ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ बँकांना १.४१ लाख कोटी रुपये इतका नफा झाला होता. सहा बँका अशा आहेत, ज्यांनी वर्षभरात १० हजार कोटींपेक्षा अधिक फायदा कमावला आहे. 

यात स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वाधिक ७०,९०१ कोटी रुपयांचा नफा कमावला. पंजाब नॅशनल बँकेच्या नफा सर्वाधिक १०१ टक्क्यांनी वाढून १६,६३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सेंट्रल बँक ७८ टक्के वाढीसह दुसऱ्या आणि पंजाब अँड सिंध बँक ७१ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे. 

शुद्ध एनपीए ०.७०% पेक्षा कमी : बँकांचा शुद्ध एनपीए ०.७०% पेक्षा कमी आहे. पंजाब अँड सिंध बँकेचा एनपीए ०.९६ टक्के आहे. सर्वात कमी ०.१८% एनपीए बँक ऑफ महाराष्ट्रचा आहे. 

‘४ आर’ धोरणामुळे एनपीएमध्ये घट

बँकांची स्थिती सुधारणे, एनपीए कमी करण्यासाठी सरकारने ‘४ आर’ धोरण राबवले. यात रिकॅपिटलायझेसन (पुनर्भांडवलीकरण) म्हणजे बँकांमध्ये भांडवल ओतणे, रिकग्निशन (ओळख पटवणे) म्हणजे अडचणीतील कर्जांची ओळख, रिझोल्युशन (निकालात काढणे) म्हणजे वाईट कर्जांचे निराकरण आणि रिफॉर्म (सुधारणा) म्हणजे बँकिंग प्रणालीत सुधारणा यांचा समावेश होता. या धोरणांमुळे बँकांचे एनपीए कमी झाले. बुडीत कर्जाची समस्या आटोक्यात आली.

४८,४५१ कोटी रुपयांचा चौथ्या तिमाहीत नफा 

चौथी तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च दरम्यान बँकांचा फायदा ४८,४५१ कोटी रुपये इतका होता. २०२३-२४ याच समान तिमाहीत बँकांचा नफा ४२,८४७६ कोटी इतका होता. यात एकट्या एसबीआयच्या नफ्याचा वाटा १८,६४३ कोटी इतका आहे. 

तिमाही आधारावर सर्व बँकांचा नफा वाढला, परंतु एसबीआयचा १० टक्के  घटला आहे. सर्वाधिक फायदा कमावण्यात १२४ टक्क्यांसह पंजाब अँड सिंध बँक आघाडीवर आहे. 

बँक ऑफ इंडियाचा नफा ८२ टक्के, पंजाब नॅशनल बँक ५२ टक्के, कॅनरा २८ टक्के, इंडियन बँक ३२ टक्के आणि इंडियन ओव्हरसीज बँक ३० टक्के नफा वाढलेला आहे. 

सर्वाधिक कमाई कुणाची? 

स्टेट बँक ऑफ इंडिया      ७०,९०१
बँक ऑफ बडोदा     १९,५८१
युनियन बँक     १७,९८७
कॅनरा बँक     १७,५४०
पंजाब नॅशनल बँक     १६,६३०
    (कोटी रुपयांमध्ये)

 

Web Title: banks earned 1 lakh crore 79 thousand profit increased by 27 percent in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.