Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार

बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार

Banking Rules RBI: आजकाल जवळपास सर्वच जण बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये बँक खाती, एटीएम, कर्ज अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. देशातील सर्व बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच आरबीआयच्या नियमांनुसार काम करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:12 IST2025-06-30T11:08:13+5:302025-06-30T11:12:43+5:30

Banking Rules RBI: आजकाल जवळपास सर्वच जण बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये बँक खाती, एटीएम, कर्ज अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. देशातील सर्व बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच आरबीआयच्या नियमांनुसार काम करतात.

Banks are not doing your job no need to worry RBI has provided facilities lokpal You can complain about them | बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार

बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार

Banking Rules RBI: आजकाल जवळपास सर्वच जण बँकिंग सेवेचा लाभ घेत आहेत. यामध्ये बँक खाती, एटीएम, कर्ज अशा अनेक सुविधांचा समावेश आहे. देशातील सर्व बँका रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणजेच आरबीआयच्या नियमांनुसार काम करतात. अशा तऱ्हेनं आरबीआयला बँकांची बँक असेही म्हटलं जातं, परंतु अनेकदा बँका आपल्या ग्राहकांचं काम करण्यास नकार देतात. त्याचबरोबर अनेकदा बँका कोणत्याही कामात दिरंगाई करतात किंवा कोणत्याही प्रकारचे पेमेंट करण्यास उशीर करतात. अशा परिस्थितीत ग्राहक बँकांबाबत कुठे आणि कशी तक्रार करू शकतात? हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया.

जर तुमची बँक तुमचं कोणतंही काम करत नसेल आणि तुम्हाला बँकेबद्दल तक्रार करायची असेल तर तुम्ही बँकिंग लोकपालाच्या माध्यमातून बँकांबद्दल तक्रार करू शकता.

PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

काय आहे बँकिंग लोकपाल? (Banking Ombudsman)

आरबीआयनं बँक ग्राहकांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी बँकिंग लोकपाल तयार केलं आहे, जेथे लोक बँकेबद्दल तक्रार करू शकतात आणि त्यांच्या समस्येचं निराकरण करू शकतात. बँकिंग लोकपालाच्या माध्यमातून तुम्ही बँकेबद्दल ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे तक्रार करू शकता. बँकिंग लोकपाल तक्रार केल्यानंतर ३० दिवसांच्या आत ग्राहकाच्या समस्येचं निराकरण केलं जातं.

कोणत्या तक्रारी करू शकता?

बँकिंग लोकपालमध्ये तुम्ही अनेक बाबींशी संबंधित तक्रार करू शकता. यामध्ये या सर्व तक्रारींचा समावेश आहे.

  • विनाकारण बँक खातं बंद करणं
  • जास्त किंवा चुकीच्या व्याजदरानं परतावा देणं किंवा कर्जावर जास्त व्याज आकारणं
  • एटीएममध्ये समस्या
  • मोबाइल बँकिंगशी संबंधित समस्या
  • चेक क्लिअरन्सला उशीर
  • क्रेडिट कार्ड समस्या
  • बँकेचा गैरव्यवहार किंवा योग्य सेवा न देणं
     

तक्रार कशी कराल?

  • बँकिंग लोकपालकडे तक्रार करण्यासाठी, प्रथम https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर जा.
  • File a Complaint पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला एक ऑनलाइन फॉर्म मिळेल. आता हा फॉर्म भरा आणि Submit वर क्लिक करा.
  • यानंतर तुमची तक्रार सबमिट केली जाईल.
  • तुम्हाला एक Complaint Reference Number देखील मिळेल, जेणेकरून तुम्ही नंतर ते ट्रॅकही करू शकता.

Web Title: Banks are not doing your job no need to worry RBI has provided facilities lokpal You can complain about them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.