Lokmat Money > बिझनेस न्यूज > दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा

दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा

Bank Holiday in October : ऑक्टोबर महिना सणांनी भरलेला असतो. त्यामुळे या महिन्यात बँका तब्बल २१ दिवस बंद राहतील. सुट्टीचे कॅलेंडर पाहूनच बँकेत जा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:30 IST2025-09-28T15:11:23+5:302025-09-28T15:30:01+5:30

Bank Holiday in October : ऑक्टोबर महिना सणांनी भरलेला असतो. त्यामुळे या महिन्यात बँका तब्बल २१ दिवस बंद राहतील. सुट्टीचे कॅलेंडर पाहूनच बँकेत जा.

Bank Holidays October 2025 Check RBI List of 21 Festive Closures | दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा

दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा

Bank Holiday in October : सध्या देशभरात नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू असलेली पाहायला मिळत आहे. आगामी काळात दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण ऑक्टोबर महिन्यात असल्याने, बँकांच्या सुट्ट्यांची मोठी मालिका या महिन्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात तुमचं बँकेत काही काम असेल तर लवकर उरकून घ्या. सुट्ट्यांची गैरसोय टाळण्यासाठी आपल्या राज्याची सुट्ट्यांची यादी तपासूनच बँकेची कामे पूर्ण करावीत, कारण प्रत्येक राज्यातील सुट्ट्या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.

दुर्गा पूजा ते गांधी जयंती: सलग सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच मोठ्या सुट्ट्यांनी होत आहे

  • २ ऑक्टोबर हा गांधी जयंतीमुळे राष्ट्रीय सुट्टीचा दिवस असतो.
  • पश्चिम बंगालमध्ये सलग ६ दिवस सुट्टी: कोलकाता आणि पश्चिम बंगालमध्ये महासप्तमीपासून सुट्ट्या सुरू होत आहेत. यात २७ सप्टेंबर (शनिवार), २८ सप्टेंबर (रविवार), २९ आणि ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर (महानवमी) आणि २ ऑक्टोबर (गांधी जयंती) या सलग ६ दिवसांचा समावेश आहे.
  • इतर राज्यांत: १ ऑक्टोबर (महानवमी) रोजी बिहार, झारखंड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरासह अनेक राज्यांमध्ये बँका बंद असतील.
  • केरळमध्ये ३० सप्टेंबरला सुट्टी असल्याने तेथील कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांची मोठी सुट्टी मिळाली आहे.

महाराष्ट्रासह प्रमुख राज्यांसाठी महत्त्वाच्या सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्यात खालील प्रमुख दिवशी बँका बंद राहतील (यात दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह रविवारचा साप्ताहिक अवकाशही समाविष्ट आहे):

तारीख (ऑक्टोबर) सण/महत्त्व सुट्टी असलेले प्रमुख राज्ये 
६ लक्ष्मी पूजा पंजाब, ओडिशा, त्रिपुरा, पश्चिम बंगाल 
महर्षी वाल्मिकी जयंती हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक 
२०दिवाळीअरुणाचल प्रदेश, आसाम, कर्नाटक, केरळ 
२१दिवाळी आंध्र प्रदेश, बिहार 
२२दिवाळी/भाईदूज हरियाणा, महाराष्ट्र (महाराष्ट्र राज्यासाठी सुट्टी) 
२३दिवाळी/भाईदूजगुजरात, उत्तर प्रदेश 
२७-२८छठ पूजा बिहारमध्ये सलग २ दिवसांची सुट्टी 

वाचा - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं

ग्राहकांसाठी सल्ला
सणासुदीच्या या काळात बँकांमध्ये होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी नेट बँकिंग, यूपीआय आणि मोबाइल बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांचा अधिकाधिक वापर करावा. तसेच, मोठी रोख रक्कम काढायची असल्यास, सुट्टीचा दिवस पाहून कामाचे नियोजन करा. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी आपल्या स्थानिक बँकेच्या शाखेशी संपर्क साधून सुट्ट्यांची निश्चिती करून घ्यावी.

Web Title : अक्टूबर में बैंकों में छुट्टियां: 21 दिनों की छुट्टी में बैंकिंग का काम करें प्लान

Web Summary : अक्टूबर में दुर्गा पूजा और दिवाली जैसे त्योहारों के कारण बैंकों में कई छुट्टियां हैं। बैंक 21 दिनों तक बंद रहेंगे। बैंकिंग कार्यों की योजना उसी अनुसार बनाएं, जहां संभव हो वहां डिजिटल सेवाओं का उपयोग करें। असुविधा से बचने के लिए अपने राज्य के लिए विशिष्ट छुट्टी सूची की जांच करें।

Web Title : Bank Holidays in October: Plan Banking Work Around 21 Holiday Days

Web Summary : October brings many bank holidays due to festivals like Durga Puja and Diwali. Banks will remain closed for up to 21 days. Plan banking tasks accordingly, using digital services where possible. Check the specific holiday list for your state to avoid inconvenience.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.