Bank Holiday in December : पुढील महिन्यात तुमची बँकेत काही कामे असतील तर घाई करा. डिसेंबर २०२५ हा महिना बँकिंग ग्राहकांसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. कारण, या महिन्यात बँक सुट्ट्यांचे असे कॅलेंडर समोर आले आहे, ज्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. या वेळी डिसेंबरमध्ये एकूण १८ दिवस बँका बंद राहणार आहेत. इतकेच नाही, तर काही राज्यांमध्ये तर सलग ५ दिवस बँकांचे कामकाज थांबणार आहे. त्यामुळे तुमची कोणतीही महत्त्वाची बँकिंग कामे बाकी असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकद्वारे जारी केलेल्या यादीनुसार, या सुट्ट्या राष्ट्रीय, राज्य-स्तरीय सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे (शनिवार-रविवार) निश्चित करण्यात आल्या आहेत.
डिसेंबर २०२५ बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी
| तारीख | सुट्ट्यांचे स्वरूप | कुठे बंद राहतील बँका? |
| १ डिसेंबर | राज्यानुसार सण | अरुणाचल प्रदेश, नागालँड |
| ३ डिसेंबर | राज्यानुसार सण | गोवा |
| ७ डिसेंबर | साप्ताहिक सुट्टी | संपूर्ण देश (रविवार) |
| १२ डिसेंबर | राज्यानुसार सण | मेघालय |
| १३ डिसेंबर | साप्ताहिक सुट्टी | संपूर्ण देश (दुसरा शनिवार) |
| १४ डिसेंबर | साप्ताहिक सुट्टी | संपूर्ण देश (रविवार) |
| १८ डिसेंबर | राज्यानुसार सण | मेघालय |
| १९ डिसेंबर | राज्यानुसार सण | गोवा |
| २० डिसेंबर | राज्यानुसार सण | सिक्कीम |
| २१ डिसेंबर | साप्ताहिक सुट्टी | संपूर्ण देश (रविवार) |
| २२ डिसेंबर | राज्यानुसार सण | सिक्कीम |
| २४ डिसेंबर | राज्यानुसार सण | नागालँड, मिझोराम, मेघालय |
| २५ डिसेंबर | राष्ट्रीय सुट्टी | संपूर्ण देश (ख्रिसमस) |
| २६ डिसेंबर | राज्यानुसार सण | नागालँड, मिझोराम, मेघालय |
| २७ डिसेंबर | साप्ताहिक सुट्टी | संपूर्ण देश (चौथा शनिवार) |
| २८ डिसेंबर | साप्ताहिक सुट्टी | संपूर्ण देश (रविवार) |
| ३० डिसेंबर | राज्यानुसार सण | मेघालय |
| ३१ डिसेंबर | | राज्यानुसार सण | मणिपूर, मिझोराम |
या तीन राज्यांमध्ये सलग ५ दिवसांचा मेगा ब्रेक
नागालँड, मिझोराम आणि मेघालय या राज्यांमध्ये पुढील महिन्यात सलग ५ दिवस बँका बंद राहतील. या राज्यांमध्ये २४, २५, २६, २७ आणि २८ डिसेंबर रोजी बँकांचे कामकाज पूर्णपणे थांबलेले असेल.
ऑनलाइन सेवा अखंड सुरू
या सुट्ट्यांमध्येही ग्राहकांना मोठा दिलासा आहे, कारण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, UPI आणि एटीएम सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
वाचा - पैसा तिप्पट करणारी गुंतवणूक! 'या' ५ म्युच्युअल फंडांनी ३ वर्षांत दिले ३१% पेक्षा जास्त रिटर्न!
महत्वाचे : सुट्ट्यांच्या दिवशी चेक क्लिअरिंग, पासबुक एंट्री, डिमांड ड्राफ्ट आणि काउंटरवरून होणारी कामे बंद राहतील. त्यामुळे, तुमचे कोणतेही महत्त्वाचे ऑफलाइन बँकिंग काम असेल, तर ते या सुट्ट्या सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करून घ्या.
