Bank Holiday: भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँका ३० मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकूण सुमारे ६ दिवस बंद असू शकतात. महावीर जयंती आणि गुड फ्रायडे यांसारख्या सणांमुळे या सुट्ट्या आहेत. यामध्ये रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे.
३० मार्च ते ५ एप्रिल दरम्यानच्या बँक सुट्ट्यांची यादी
३० मार्च (सोमवार) — महावीर जयंती: कर्नाटक मध्ये बँका बंद राहतील.
३१ मार्च (मंगळवार) — महावीर जयंती: गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, बिहार, छत्तीसगड, झारखंड मध्ये बँका बंद राहतील.
१ एप्रिल (बुधवार) — अॅन्युअल क्लोझिंग: दिल्ली, यूपी, महाराष्ट्र, गुजरात यांसारख्या अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
२ एप्रिल (गुरुवार) — मौंडी थर्सडे: केरळ मध्ये बँका बंद राहतील.
३ एप्रिल (शुक्रवार) — गुड फ्रायडे: जवळपास संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
५ एप्रिल (रविवार) — साप्ताहिक सुट्टी: सर्व बँका साप्ताहिक सुट्टीमुळे बंद राहतील.
चांदीच्या किमतीत ६ हजारांपेक्षा तर सोन्याच्या किमतीत ३ हजारांपेक्षा अधिक वाढ, खरेदीपूर्वी पहा नवे दर
शनिवार आणि रविवारचे नियम
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी बँका सुरू असतात. प्रत्येक रविवारी बँका बंद असतात.
बँक सुट्ट्यांमध्ये ऑनलाईन सेवा सुरू राहतील का?
हो, बँकेच्या सुट्ट्यांमध्येही ऑनलाईन बँकिंग सेवा सुरू राहतात. तुम्ही UPI, पैसे ट्रान्सफर, नेट बँकिंग, लोन अप्लाय, चेकबुक रिक्वेस्ट यांसारख्या सुविधांचा वापर करू शकता. परंतु, शाखेत जाऊन केली जाणारी कामं या दिवसांत होऊ शकणार नाहीत. त्यामुळे, तुमच्या जवळच्या बँकेकडून सुट्ट्यांची खात्री करून घेणं अधिक सोयीचं ठरेल.
