Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!

सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!

Banks Closed on Diwali: जर तुम्ही सोमवारी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या परिसरातील बँका बंद आहेत का हे पाहण्यासाठी ही बातमी वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:15 IST2025-10-19T16:15:31+5:302025-10-19T16:15:56+5:30

Banks Closed on Diwali: जर तुम्ही सोमवारी बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या परिसरातील बँका बंद आहेत का हे पाहण्यासाठी ही बातमी वाचा.

Bank Holiday Alert Are Banks Open on Monday, October 20th for Diwali? Check RBI's State-wise List | सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!

सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!

Banks Closed on Diwali : सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे. ऑक्टोबर महिना संपायला आला असला तरी या महिन्यात अजूनही बँकांच्या काही सुट्ट्या बाकी आहेत. धनत्रयोदिशीच्या दिवशी अनेक राज्यांमध्ये बँका सुरू होत्या, त्यामुळे आता दिवाळीच्या मुख्य दिवशी (सोमवार, २० ऑक्टोबर) बँक सुरू असेल की बंद, याबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे. जर तुम्हाला सोमवार २० ऑक्टोबर रोजी बँकेत कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असेल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार तुमच्या राज्यात बँक बंद आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.

सोमवारी कोणत्या राज्यात बँक बंद?
सोमवारी, दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजन) असल्याने, देशातील अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. अगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बंगळूरु, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर, जयपूर, कानपूर, कोची, कोहिमा, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला, तिरुवनंतपुरम, विजयवाडा या सर्व ठिकाणी बँका बंद राहतील. (या यादीमध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशचाही समावेश आहे.) याउलट, बेलापूर, भुवनेश्वर, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, श्रीनगर येथे मात्र सोमवारी बँकांमध्ये नेहमीप्रमाणे कामकाज सुरू राहील. तुम्ही मुंबई किंवा नागपूरमध्ये असाल, तर तुमच्याकडील बँका सोमवारी सुरू असतील.

ऑक्टोबर महिन्यातील उर्वरित बँक सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्यात दिवाळीनंतरही काही महत्त्वाच्या सणांमुळे बँकांना सुट्टी असणार आहे (राज्यानुसार सुट्ट्या बदलू शकतात).

तारीखसुट्टीचे नावलागू होणारी राज्ये
२१ ऑक्टोबरदिवाळी (बलि प्रतिपदा) / विक्रम संवत नव वर्ष / गोवर्धन पूजा / लक्ष्मी पूजागुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र
२२ ऑक्टोबरभाई बीज / भाई दूज / चित्रगुप्त जयंतीउत्तर प्रदेश, दिल्ली, मणिपूर
२७ ऑक्टोबरछठ पूजा (सायंकाळ)बिहार, झारखंड
२८ ऑक्टोबरछठ पूजा (सकाळ)बिहार, झारखंड
३१ ऑक्टोबरसरदार वल्लभभाई पटेल जयंतीगुजरात

बँक बंद असल्यास कोणते व्यवहार करता येतील?

  • बँका बंद असल्या तरी ग्राहकांना अनेक आर्थिक व्यवहार डिजिटल पद्धतीने करता येतात.
  • एटीएमद्वारे तुम्ही कधीही रोख रक्कम काढू शकता.

वाचा - जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही

  • बँकिंग सेवा डिजिटल झाल्यामुळे तुम्ही UPI, नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे पैशांचे व्यवहार कधीही करू शकता.
  • त्यामुळे, बँकेचे कोणतेही अत्यावश्यक काम असल्यास, कृपया तुमच्या क्षेत्रातील सुट्टीची यादी तपासूनच घराबाहेर पडा.
     

Web Title : दिवाली पर बैंक अवकाश: सोमवार को जाने से पहले आरबीआई सूची जांचें!

Web Summary : दिवाली पर कई राज्यों में बैंक बंद हैं। यह देखने के लिए आरबीआई की छुट्टी सूची जांचें कि आपका स्थानीय बैंक सोमवार को खुला है या नहीं। डिजिटल लेनदेन उपलब्ध रहेंगे।

Web Title : Diwali Bank Holiday: Check RBI List Before Visiting on Monday!

Web Summary : Banks are closed in many states on Diwali. Check RBI holiday list to see if your local bank is open Monday. Digital transactions remain available.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.