Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँक ग्राहक संतापले, तक्रारींचा पूर; आरबीआयकडे वर्षभरात तब्बल १३ लाख तक्रारी; १३.५५ टक्के वाढ

बँक ग्राहक संतापले, तक्रारींचा पूर; आरबीआयकडे वर्षभरात तब्बल १३ लाख तक्रारी; १३.५५ टक्के वाढ

कर्जव्यवहार व क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी; आक्रमक कर्जवसुलीमुळे संताप; मुंबई–पुण्यात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 06:55 IST2025-12-08T06:54:21+5:302025-12-08T06:55:47+5:30

कर्जव्यवहार व क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी; आक्रमक कर्जवसुलीमुळे संताप; मुंबई–पुण्यात डिजिटल फसवणुकीचे प्रमाण वाढले

Bank customers angry, flood of complaints; RBI receives 1.3 lakh complaints in a year; 13.55 percent increase | बँक ग्राहक संतापले, तक्रारींचा पूर; आरबीआयकडे वर्षभरात तब्बल १३ लाख तक्रारी; १३.५५ टक्के वाढ

बँक ग्राहक संतापले, तक्रारींचा पूर; आरबीआयकडे वर्षभरात तब्बल १३ लाख तक्रारी; १३.५५ टक्के वाढ

चंद्रकांत दडस

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ग्राहकांचे समाधान हा बँकिंगचा पाया असताना भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ग्राहकांच्या तक्रारींचा ओघ झपाट्याने वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल १३,३४,२४४ तक्रारी ग्राहकांनी बँकांबाबाबत आरबीआयकडे केल्या आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही १३.५५ टक्के वाढ आहे. मुख्यत: कर्जव्यवहार व क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारी या सर्वाधिक असल्याचे आरबीआयच्या अहवालातून समोर आले.

इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा

अहवालानुसार, मुंबई–पुण्यात डिजिटल फसवणूक व क्रेडिट कार्डबाबत तक्रारी वाढल्या आहेत. आरबीआयकडे लहान फायनान्स बँकांविरुद्धच्या तक्रारींमध्ये ४२% टक्के वाढ झाली आहे. कर्ज व थकबाकी वसुलीबाबत २९.२५ टक्के लोकांनी तक्रार केल्या आहेत.

कारण   तक्रारी टक्के

कर्ज    ८६,६७० २९.२५%

क्रेडिट कार्ड      ५०,८११        १७.१५%

मोबाइल बँकिंग ४९,९५१ १६.८६%

ठेव खाती       ४९,९१३        १६.८४%

एटीएम/डेबिट कार्ड १८,०८२       ६.१०%

पैसे पाठवणे     ३,७०२  १.२५%

पॅरा-बँकिंग      ३,३२२  १.१२%

पेन्शन संबंधित २,७१९  ०.९२%

नोटा आणि नाणी       ३९१    ०.१३%

इतर उत्पादने    ३०,७६० १०.३८%

कोणत्या बँकांविरोधात तक्रारी?

बँकांचा प्रकार    २०२४-२५       वाटा %

सार्वजनिक बँका  १,०३,११७       ३४%

खासगी बँका    १,११,१९९       ३७.५३%

पेमेंट बँका      ७,३९५  २.५०%

लहान वित्त बँका  ५,६५० १.९१%

प्रादेशिक ग्रामीण बँका    ३,०१३ १.०२%

नागरी सहकारी बँका     ३,३६९ १.१४%

Web Title : बैंक ग्राहक नाराज़: शिकायतों की बाढ़; आरबीआई को 13 लाख शिकायतें

Web Summary : आरबीआई को 13.34 लाख बैंक शिकायतें मिलीं, जो 13.55% की वृद्धि है। ऋण और क्रेडिट कार्ड के मुद्दे शिकायतों में सबसे ऊपर हैं। मुंबई और पुणे में डिजिटल धोखाधड़ी की शिकायतें बढ़ीं। छोटे वित्त बैंकों की शिकायतें 42% बढ़ीं।

Web Title : Bank Customers Angered: Flood of Complaints; RBI Receives 1.3 Million

Web Summary : RBI received 13.34 lakh bank complaints, a 13.55% increase. Loan and credit card issues topped complaints. Digital fraud complaints rose in Mumbai and Pune. Small finance bank complaints surged by 42%.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.