lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जाणार, अरुण जेटली यांचे प्रतिपादन : भारतात अमेरिकी कंपन्यांना मोठ्या संधी

भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जाणार, अरुण जेटली यांचे प्रतिपादन : भारतात अमेरिकी कंपन्यांना मोठ्या संधी

भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. ते वास्तवात येऊ शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:30 AM2017-10-14T03:30:05+5:302017-10-14T03:30:45+5:30

भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. ते वास्तवात येऊ शकते.

 Arun Jaitley's Rendering: India's US $ 500 Billion Business Goal: Big opportunities for American companies in India | भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जाणार, अरुण जेटली यांचे प्रतिपादन : भारतात अमेरिकी कंपन्यांना मोठ्या संधी

भारत-अमेरिकेतील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर जाणार, अरुण जेटली यांचे प्रतिपादन : भारतात अमेरिकी कंपन्यांना मोठ्या संधी

वॉशिंग्टन : भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार ५०० अब्ज डॉलरवर नेण्याचे लक्ष्य हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. ते वास्तवात येऊ शकते. कारण भारतात अमेरिकी कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषत: संरक्षण आणि विमान क्षेत्रात अधिक चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
फिक्कीच्या वतीने आंतरराष्टÑीय नाणेनिधीच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जेटली बोलत होते. त्यांनी म्हटले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि अमेरिकेचे संबंध फारच मजबूत भागीदारीच्या स्वरूपात उदयास आले आहेत. ‘मिशन-५००’ हे उद्दिष्ट आणि भागीदारीचे विभिन्न पैलू यावर जोर देण्यात येत आहे. संरक्षण आणि विमान क्षेत्रातील संधींकडे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल की, द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलरच्या पातळीवर घेऊन जाणे हे काही आता अशक्य काम राहिलेले नाही.
अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीच्या आकडेवारीनुसार, भारत हा आता अमेरिकेचा नववा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. गेल्या वर्षी दोन्ही देशांचा द्विपक्षीय व्यापार ६७.७ अब्ज डॉलर होता. हा व्यापार भारताला फायदेशीर ठरला. त्यात २४ अब्ज डॉलरचा अधिशेष आहे.

Web Title:  Arun Jaitley's Rendering: India's US $ 500 Billion Business Goal: Big opportunities for American companies in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.