Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेंडुलकरांच्या घरी लगीनघाई! Arjun Tendulkar बोहल्यावर चढणार, नेटवर्थ किती?

तेंडुलकरांच्या घरी लगीनघाई! Arjun Tendulkar बोहल्यावर चढणार, नेटवर्थ किती?

Arjun Tendulkar Networth: भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू आणि 'मास्टर-ब्लास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह सानिया चंडोक हिच्याशी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:58 IST2026-02-11T13:57:27+5:302026-02-11T13:58:41+5:30

Arjun Tendulkar Networth: भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू आणि 'मास्टर-ब्लास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह सानिया चंडोक हिच्याशी होणार आहे.

Arjun Tendulkar Networth Wedding with business woman saania chandok what is arjuns net worth | तेंडुलकरांच्या घरी लगीनघाई! Arjun Tendulkar बोहल्यावर चढणार, नेटवर्थ किती?

तेंडुलकरांच्या घरी लगीनघाई! Arjun Tendulkar बोहल्यावर चढणार, नेटवर्थ किती?

Arjun Tendulkar Networth: भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू आणि 'मास्टर-ब्लास्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची धामधूम पाहायला मिळणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा विवाह सानिया चंडोक हिच्याशी होणार आहे. सानिया ही एका मोठ्या व्यावसायिक घराण्यातील असून, तिचे आजोबा भारतीय व्यापार जगतातील दिग्गज व्यक्तिमत्व रवी घई आहेत. 

अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबईत झाला होता. आता या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यास सुरुवात झाली असून, तेंडुलकर कुटुंबीयांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. तसंच राहुल गांधी यांनाही लग्नाची पत्रिका देण्यात आलीये.

शेअर असावा तर असा! दररोज लागतंय अपर सर्किट, महिन्याभरात दिलाय ७०% चा रिटर्न

अर्जुन तेंडुलकरची नेटवर्थ

अर्जुन तेंडुलकर हा स्वतः एक क्रिकेटपटू असून त्याची एकूण संपत्ती (नेटवर्थ) सुमारे २१ ते २२ कोटी रुपये इतकी अंदाजित आहे. त्याच्या उत्पन्नाचा मोठा वाटा क्रिकेटच्या विविध फॉरमॅटमधून मिळणाऱ्या मानधनाचा आहे. अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करतो, तर २०२१ पासून तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता. mykhel.com नुसार २०२१ मध्ये त्याला २० लाख रुपयांच्या मूळ किमतीवर खरेदी करण्यात आलं होतं, त्यानंतर २०२२ पासून त्याला दरवर्षी ३० लाख रुपयांच्या रकमेवर संघात कायम ठेवण्यात आले. रिपोर्टनुसार, २०२६ च्या आयपीएलमध्ये तो लखनऊ संघाकडून खेळताना दिसू शकतो. गेल्या पाच आयपीएल हंगामात त्याने एकूण १.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

लक्झरी कारची आवड

अर्जुन तेंडुलकर आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वांद्रे (पश्चिम) येथील '१९-ए पेरी क्रॉस रोड' या बंगल्यात राहतो. अर्जुनला त्याच्या वडिलांप्रमाणेच महागड्या आणि लक्झरी कारची विशेष आवड आहे. तेंडुलकर कुटुंबाच्या कार कलेक्शनमध्ये किआ कॅरेन्स, पोर्श कायने, बीएमडब्ल्यू i8, निसान GTR, फेरारी ३६० मोडेना आणि मर्सिडीज-एएमजी C36 यांसारख्या अनेक आलिशान गाड्यांचा समावेश आहे.

व्यावसायिक पार्श्वभूमी असलेली सानिया चंडोक

अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. रवी घई यांचा व्यवसाय हॉटेलपासून ते आईस्क्रीम उद्योगापर्यंत पसरलेला असून, हे सर्व व्यवसाय 'ग्रेविस ग्रुप' अंतर्गत चालवले जातात. द ब्रुकलिन क्रीमरी आणि बास्किन-रॉबिन्स सारखे नामांकित ब्रँड्स याच ग्रुपचे आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीनुसार, सानिया सध्या मुंबईतील 'मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर LLP' मध्ये भागीदार आणि संचालक म्हणून कार्यरत आहे.

Web Title : अर्जुन तेंदुलकर सानिया चंडोक से करेंगे शादी: नेट वर्थ डिटेल्स

Web Summary : सचिन तेंदुलकर के बेटे अर्जुन, सानिया चंडोक से शादी करने वाले हैं। उनकी सगाई पिछले अगस्त में हुई थी। अर्जुन की कुल संपत्ति लगभग ₹21-22 करोड़ आंकी गई है, जो मुख्य रूप से क्रिकेट से है। सानिया व्यवसायी रवि घई की पोती हैं और 'मिस्टर पॉज़ पेट स्पा' में शामिल हैं।

Web Title : Arjun Tendulkar to Wed Sania Chandok: Net Worth Details

Web Summary : Sachin Tendulkar's son, Arjun, is set to marry Sania Chandok. Their engagement was last August. Arjun's net worth is estimated at ₹21-22 crore, mainly from cricket. Sania is the granddaughter of businessman Ravi Ghai and is involved in 'Mr. Paws Pet Spa'.