Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी स्कीम्स लोकांना 'कामचोर' बनवताहेत का? एल अँड टी अध्यक्षांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद

सरकारी स्कीम्स लोकांना 'कामचोर' बनवताहेत का? एल अँड टी अध्यक्षांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद

अलीकडेच एल अँड टी प्रमुखांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता त्यांच्या आणखी एका वक्तव्याची चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 10:41 IST2025-02-12T10:36:57+5:302025-02-12T10:41:10+5:30

अलीकडेच एल अँड टी प्रमुखांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता त्यांच्या आणखी एका वक्तव्याची चर्चा सुरू आहे.

Are government schemes making people reluctant L and T Chairman s new statement sparks controversy | सरकारी स्कीम्स लोकांना 'कामचोर' बनवताहेत का? एल अँड टी अध्यक्षांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद

सरकारी स्कीम्स लोकांना 'कामचोर' बनवताहेत का? एल अँड टी अध्यक्षांच्या नव्या वक्तव्यामुळे वाद

अलीकडेच एल अँड टी प्रमुखांच्या एका वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्यांच्या या वक्तव्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. प्रत्यक्षात त्यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास आणि रविवारीही काम करण्यास सांगितलं होतं. इतकंच नाही तर सुट्टीच्या दिवशी घरी बसून काय करणार, असंही सुब्रमण्यन म्हणाले बोके. किती वेळ बायकोकडे बघणार? या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.
सुब्रमण्यन यांच्या ताज्या वक्तव्यावर आता लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मालक आणि कर्मचारी यांच्यातील गुलाम आणि मालकाचं युग संपलंय , असं लोकांचं मत आहे. कर्मचाऱ्यांचं बदलतं वर्तन समजून घ्यावं लागेल, असंही काहींनी म्हटलंय.

मजूर जमवण्याच्या समस्येचा उल्लेख

"आम्हाला ४ लाख मजुरांची नियुक्ती करावी लागते आणि त्यांना तीन ते चार वेळा जाऊ द्यावं लागतं. ४ लाख मजुरांची नियुक्ती करण्यासाठी आम्हाला जवळपास ६० लाख लोकांची नियुक्ती करावी लागते," असं सुब्रमण्यन म्हणाले. मजुरांना जमवण्याची पद्धत आता बदलली आहे. नव्या साईट्ससाठी कारपेंटर आणण्यासाठी कंपनी त्या कंपनीत आधी काम केलेल्या किंवा सध्या काम करत असलेल्या लोकांची यादी पाठवते. त्यानंतर काम करायचंय का नाही हे मजूर स्वत: ठरवतात, असंही ते म्हणाले. कल्पना करा जर आम्हाला दर वर्षी १६ लाख मजूर हवे असतात. यासाठी आम्ही एक लेबरसाठी एचआर विभाग तयार केला आहे. जो कंपनीत अस्तित्वात नाही, तो इथे अस्तित्वात आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

सरकारी स्कीम्स कारण

एल अँड टीच्या सीएमडी यांच्या म्हणण्यानुसार, लोक कामावर न येण्याची अनेक कारणं आहेत. जनधन खातं, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण, गरीब कल्याण योजना, मनरेगा सारख्या योजनांमुळे लोक ग्रामीण भागात आरामात राहणं पसंत करत आहेत. बँक खाते (जनधन), थेट लाभ हस्तांतरण, गरीब कल्याण योजना, मनरेगा अशा योजना असल्यानं लोक विविध कारणांसाठी येण्यास तयार नाहीत. त्यांना ग्रामीण भागातून स्थलांतर करायचं नाही, त्यांचं आरामाला प्राधान्य असल्याचंही सुब्रमण्यन म्हणाले.

इंजिनिअरिंग आणि अन्य विभागातही समस्या

इंजिनिअरिंग पदांमध्येही अशीच समस्या आहे. ते दुसरीकडे जाऊन काम करण्यास तयार नाहीत. जेव्हा मी १९८३ मध्ये एल अँड टीमध्ये आलो, तेव्हा माझ्या बॉसनं मला तुम्ही चेन्नईतून असाल तर दिल्ली जाऊन काम करा असं म्हटलं. पण आज मी चेन्नईच्या व्यक्तीला दिल्ला जाऊन काम करायला सांगितलं, तर ती व्यक्ती ते करत नाही. आयटी क्षेत्रात ही समस्या अधिक आहे, जिथे कर्मचारी कार्यालयातून काम करण्यास तयार नाही आणि जुनी पिढी हे समजण्यासाठी संघर्ष करत आहे, असं सुब्रमण्यन म्हणाले.

जर तुम्ही त्यांना कार्यालयात येऊन काम करण्यास सांगितलं तर तो तुम्हाला बाय करतो. हे पूर्णपणे निराळं जग आहे, ज्यात आपण जगण्याचे प्रयत्न करत आहोत आणि आमच्यापैकी काही लोक आहेत जे हे समजण्याचे प्रयत्न करत आहेत. या जगासोबत कसं राहायचं हे आम्हाला पाहावं लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: Are government schemes making people reluctant L and T Chairman s new statement sparks controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.