नवी दिल्ली : २२ सप्टेंबरपासून विमा कंपन्या वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा पॉलिसीवरील कमिशन व ब्रोकरेज यांसारख्या ‘इनपुट’ सेवांवर दिलेल्या जीएसटीसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकणार नाहीत, असे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने स्पष्ट केले. सेवा जीएसटीमुक्त झाल्यामुळे कमिशन व ब्रोकरेजवरील क्रेडिट काढून घेतले जाईल; फक्त पुनर्विमा सेवांना सवलत राहील. विमा कंपन्यांना या कराचा खर्च स्वतः सोसावा लागेल.
ग्राहकांना मिळणार फायदा
७,५०० रुपये प्रतिदिनापर्यंतच्या हॉटेल रूम्स व सौंदर्य तसेच फिटनेस सेवांवरही ५ टक्के दराने जीएसटी लागू असून अशा पुरवठ्यांवरही आयटीसी मिळणार नाही, असे ‘सीबीआयसी’ने म्हटले आहे.
शेवटच्या ग्राहकाला या बदलांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी दुहेरी दर रचनेला परवानगी देण्यात आलेली नाही.