Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमूलने ग्राहकांना दिली गुड न्यूज! दुधाच्या दरात कपात; जाणून घ्या एक लिटरचा नवा भाव

अमूलने ग्राहकांना दिली गुड न्यूज! दुधाच्या दरात कपात; जाणून घ्या एक लिटरचा नवा भाव

Amul Milk : अमूल दूध ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने आज अमूल दुधाच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:17 IST2025-01-24T16:17:57+5:302025-01-24T16:17:57+5:30

Amul Milk : अमूल दूध ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) ने आज अमूल दुधाच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

amul milk cheaper by 1 per litre relief for consumers in gujarat | अमूलने ग्राहकांना दिली गुड न्यूज! दुधाच्या दरात कपात; जाणून घ्या एक लिटरचा नवा भाव

अमूलने ग्राहकांना दिली गुड न्यूज! दुधाच्या दरात कपात; जाणून घ्या एक लिटरचा नवा भाव

Amul Milk : महागाईच्या काळात अमूलने ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) आज अमूल दुधाच्या किमती १ रुपयांनी कमी केल्याचे जाहीर केले आहे. उत्पादन खर्चात झालेली घट आणि बाजारातील मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सध्या ही दरकपात फक्त गुजरातमधील ग्राहकांनाच मिळणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात अमूलचं दुध विकलं जातं. पण, राज्यात दूर कपात होणार का? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

नवीन किंमतीनुसार, आता अमूल गोल्डचा एक लिटर पॅक ६६ रुपयांना, तर अर्धा लिटरचा पॅक ३३ रुपयांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, अमूल फ्रेश मिल्कची किंमत आता ५४ रुपये प्रति लिटर आहे, तर अर्धा लिटर पॅक २७ रुपयांना उपलब्ध असेल. अमूल शक्तीचा एक लिटर पॅक आता ६० रुपयांना मिळणार आहे.

अमूलने दर कपात का केली?
अमूसचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले की, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि दुधाची उपलब्धता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. "उत्पादन खर्चात कपात आणि उत्तम व्यवस्थापनामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना वाजवी दरात दर्जेदार दूध मिळावे हा आमचा नेहमीच उद्देश राहिला आहे."

महागाईच्या काळात दिलासा
दिवसेंदिवस सर्वच गोष्टींच्या किमती सातत्याने वाढत आहेत. तेल, साखर, डाळी, धान्य सगळचं महागलं आहे. अशा परिस्थितीत दुधाची किंमत १ रुपयाने कमी होणे दिलासादायक बातमी आहे. विशेषत: महागाई बजेट कोलमडलेलं असताना ग्राहक या कपातीचे स्वागत करत आहेत. अमूल दुधाच्या किमती कमी केल्याने कंपनीला बाजारात स्पर्धा टिकवून ठेवण्यास मदत होईल. वेदांत, दूध रत्न आणि सुरभी यांसारख्या इतर डेअरी ब्रँडनाही या बदलाचा प्रभाव जाणवू शकतो. कारण ग्राहक आता चांगल्या किमतीत दर्जेदार उत्पादने शोधतील. परिणामी इतर ब्रँड्स देखील दुध कपात करण्याची शक्यता आहे.

Web Title: amul milk cheaper by 1 per litre relief for consumers in gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.