Donald Trump America: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या विचित्र निर्णयांमुळे चर्चेत आहेत. आता ते असं काही करण्याची तयारी करत आहेत ज्यामुळे संपूर्ण अमेरिका 'व्यसनी' होऊ शकतं. ट्रम्प आता अमेरिकेत 'मॅरिज्युआना'च्या विक्रीचे नियम शिथिल करण्याची तयारी करत आहेत. अलिकडेच, न्यू जर्सीमधील बेडमिन्स्टर येथील त्यांच्या खाजगी क्लबमध्ये एका डिनर दरम्यान, त्यांनी त्यांच्या काही देणगीदारांकडे हा हेतू व्यक्त केला. "आपल्याला याकडे लक्ष द्यावं लागेल, ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे आपण पाहणार आहोत," असं मॅरिज्युआनावरील निर्बंध शिथिल करण्याचं समर्थन करताना ट्रम्प म्हणाले.
सीएनएनच्या वृत्तानुसार, सुमारे एक वर्षापूर्वी ट्रम्प यांनी, आपण अध्यक्ष झालो तर ते अमेरिकेत मॅरिज्युआना बद्दल तयार केलेले धोरण बदलतील, असं म्हटलं होतं. ते केवळ तरुणांना याची उपलब्धता सुलभ करण्यासाठी काम करणार नाहीत तर राज्यांना मॅरिज्युआनाच्या लागवडीबाबत निर्णय घेण्याचं अधिक स्वातंत्र्य देतील, असंही म्हटलं होतं. त्यांनी हेरॉइनसारख्या धोकादायक श्रेणीतून याला काढून टाकण्याबद्दलही वक्तव्य केलं होतं.
रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
समर्थकांचा दावा, लवकरच नियम
ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की वैयक्तिक वापरासाठी कमी प्रमाणात मॅरिज्युआना बाळगल्यास अटक आणि तुरुंगाची शिक्षा संपावी. स्कॉट्स मिरॅकल-ग्रोचे सीईओ जेम्स हेगेडॉर्न, ज्या कंपनीच्या हायड्रोपोनिक्स शाखेनं गेल्या वर्षी ट्रम्प-समर्थित सुपर पीएसीला ५०००००० देणगी दिली होती, त्यांचा दावा आहे की ट्रम्प यांनी त्यांना अनेक वेळा खाजगीरित्या अनेकदा मॅरिज्युआना कमी कठोर श्रेणीत आणला जाईल याचं आश्वासन दिल्याचं ते म्हणाले.
ट्रम्प यांनी हे असंच म्हटलं नव्हतं. खरं तर, प्यू रिसर्चनुसार, ६०% अमेरिकन लोक मनोरंजनासाठी थोड्या प्रमाणात मॅरिज्युआना घेण्याच्या बाजूनं आहेत. जर कोणी मौजमजेसाठी थोड्या प्रमाणात गांजा घेतला तर त्याच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे.