अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला पुन्हा महान बनवण्याच्या आश्वासनासह दुसऱ्यांदा सत्ता स्वीकारली होती. त्यांनी अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले. अमेरिकेकडून भारताविरुद्ध तर ५० टक्के टॅरिफ लावला गेला आहे. मात्र, या सगळ्या प्रयत्नांनंतरही अमेरिकेची अर्थव्यवस्था अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे.
देशात यावर्षी दिवाळखोर घोषित होणाऱ्या कंपन्यांची संख्या १५ वर्षांतील उच्चांकावर पोहोचली आहे. आतापर्यंत ७०० हून अधिक मोठ्या आणि २,००० हून अधिक लहान कंपन्या दिवाळखोर झाल्या आहेत.
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
गेल्या वर्षी अमेरिकेत ६८७ मोठ्या कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या, तर यावर्षी नोव्हेंबरपर्यंत हा आकडा ७१७ पर्यंत पोहोचला आहे. देशात सलग तिसऱ्या वर्षी दिवाळखोर होणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ९३ टक्क्यांनी वाढली आहे. नोव्हेंबरमध्ये ६२ मोठ्या कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केला होता, तर ऑक्टोबरमध्ये ही संख्या ६८ आणि सप्टेंबरमध्ये ६६ होती. ही संख्या यावर्षी २०११ ते २०२४ च्या वार्षिक सरासरीपेक्षा ३० टक्के अधिक आहे.
का दिवाळखोर होताहेत कंपन्या?
अमेरिकेत दिवाळखोरी अशा प्रकारे वाढत आहे, जणू देश मंदीच्या विळख्यात सापडला आहे. गेल्या वर्षात लहान कंपन्यांच्या दिवाळखोरीचा दर ८३ टक्क्यांनी वाढला आहे. यावर्षी आतापर्यंत २,२२१ कंपन्यांनी सबचॅप्टर ५ (Subchapter 5) अंतर्गत दिवाळखोरीसाठी अर्ज केला आहे.
कर्ज घेण्याचा उच्च खर्च, कन्झुमर स्पेंडिंगमधील सावधगिरी आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे लहान कंपन्यांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. अमेरिकेत सध्या लहान कंपन्यांना संघर्ष करावा लागत आहे.
