Lokmat Money > बिझनेस न्यूज > Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

Amazon Prime : जर तुम्हाला चित्रपट, वेबसिरीज पाहण्याची आवड असेल तर Amazon Prime चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी पैसे खर्च करू नका. कारण, Jio, Airtel आणि VI आपल्या रिचार्जसोबत हे मोफत देत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:59 IST2025-05-06T16:40:02+5:302025-05-06T16:59:08+5:30

Amazon Prime : जर तुम्हाला चित्रपट, वेबसिरीज पाहण्याची आवड असेल तर Amazon Prime चे सबस्क्रिप्शन घेण्यासाठी पैसे खर्च करू नका. कारण, Jio, Airtel आणि VI आपल्या रिचार्जसोबत हे मोफत देत आहे.

amazon prime free subscription recharge plans of jio airtel and vi | Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

Amazon Prime : पूर्वीचे लोक टीव्हीला चिकटलेले दिसायचे. आता जमाना मोबाईलचा आला आहे. चित्रपट, वेब सिरीजपासून आयपीएल सामन्यांचे थेट प्रेक्षपण मोबाईलवर पाहता येत आहे. यासाठी युजर्स ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेगळे सबस्क्रिप्शन घेतात. यात बरेचशे पैसेही खर्च करावे लागतता. पण, जर तुम्ही थोडा स्मार्ट विचार केला तर तुमच्या मोबाईलच्या रिचार्जमध्ये तुम्हाला हे सबस्क्रिप्शन मोफत मिळतील. टेलिकॉम कंपन्या त्यांच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये त्यांच्या वापरकर्त्यांना मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन देत आहेत. आज आम्ही तुम्हाला Jio, Airtel आणि VI च्या अशा रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

जिओचा अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन प्लॅन
जिओ त्यांच्या १०२९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन देते. यामध्ये तुम्हाला ८४ दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो.

एअरटेलचा अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन प्लॅन
एअरटेल त्यांच्या ११९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन देते. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना ८४ दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज २.५ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो. एअरटेल जिओपेक्षा जवळपास २०० रुपये जास्त घेत असले तरी ५०० एमबी डेटा दररोज जास्त देत आहे.

जर तुम्हाला हा प्लॅन महाग वाटत असेल तर तुम्ही एअरटेलचा ८३८ रुपयांचा रिचार्ज करू शकता. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. शिवाय वापरकर्त्यांना ५६ दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज ३ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो.

वाचा - बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

व्हीआयचा अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन प्लॅन
व्हीआय त्यांच्या ९९६ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह वापरकर्त्यांना अमेझॉन प्राइमचे मोफत सबस्क्रिप्शन देते. या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना ८४ दिवसांच्या वैधतेसाठी अमर्यादित कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसचा फायदा मिळतो.

Web Title: amazon prime free subscription recharge plans of jio airtel and vi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.