lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मृत्यू नको, अमर व्हायचंय म्हणून Amazon चे मालिक जेफ बोजेस यांची कोट्यवधीची गुंतवणूक

मृत्यू नको, अमर व्हायचंय म्हणून Amazon चे मालिक जेफ बोजेस यांची कोट्यवधीची गुंतवणूक

अलीकडेच अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी स्पेसचा दौराही केला होता. बिझनेस इनसायडरमते, जेफ बेजोस सध्या २०० बिलियन डॉलर संपत्तीचे मालक आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:35 PM2021-09-11T12:35:06+5:302021-09-11T12:35:35+5:30

अलीकडेच अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी स्पेसचा दौराही केला होता. बिझनेस इनसायडरमते, जेफ बेजोस सध्या २०० बिलियन डॉलर संपत्तीचे मालक आहेत.

Amazon Owner Jeff Bezos Invested Money On Unity Biotechnology Company Know The More Details | मृत्यू नको, अमर व्हायचंय म्हणून Amazon चे मालिक जेफ बोजेस यांची कोट्यवधीची गुंतवणूक

मृत्यू नको, अमर व्हायचंय म्हणून Amazon चे मालिक जेफ बोजेस यांची कोट्यवधीची गुंतवणूक

जगभरात खूप कमी माणसं आहेत जी वृद्धापकाळ पाहू इच्छितात आणि ज्यांना मरणाची इच्छा असते. विज्ञानाच्या जगात यावर संशोधन सुरू आहे. जगात Unity Biotechnology नावाची कंपनी आहे जी यावर रिसर्च करत आहे. ही कंपनी मानवी शरीरावर अनेक वर्ष संशोधन करत आहे. अशावेळी अमेझॉनचे मालक जेफ बेजोस(Jeff Bezos) यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आहे. ही कंपनी रिसर्च करेल आणि अमरत्व मिळेल अशी आशा जेफ बेजोस यांना आहे.

अलीकडेच अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी स्पेसचा दौराही केला होता. बिझनेस इनसायडरमते, जेफ बेजोस सध्या २०० बिलियन डॉलर संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी Unity Biotechnology नावाच्या स्टार्ट कंपनीत गुंतवणूक करत त्यांनी येणाऱ्या काळात ही कंपनी महत्त्वाचं काम करणार असल्याचे संकेत दिले. ही कंपनी वाढत्या वयामुळे होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी (Reverse Ageing) वर संशोधन करत आहे. त्याशिवाय मानवी शरीरातील सेलवरही कंपनी काम करत आहे.

नुकतीच या कंपनीने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती सार्वजनिकरित्या जाहीर केली आहे. Reverse Ageing तंत्रज्ञानावर या कंपनीत काम सुरू आहे. या पत्रकार परिषदेनंतर कंपनीने Altos Lab ची स्थापना केली. या कंपनीत अनेक बड्या उद्योगपतींनी गुंतवणूक केली आहे. ज्यात रशियाचे कोट्यधीश Yuri Milner आणि त्यांची पत्नी Julia यांच्याही नावाचा समावेश आहे. यांनीही कंपनीतील संशोधनासाठी पैशाची गुंतवणूक केली आहे.

Web Title: Amazon Owner Jeff Bezos Invested Money On Unity Biotechnology Company Know The More Details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.