Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार

महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार

Amazon Marketplace Fee: ग्राहकांना थोडासा भुर्दंड बसणार असला तरी अ‍ॅमेझॉन कंपनीला अब्जावधींचा फायदा होणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 17:31 IST2025-06-05T17:31:24+5:302025-06-05T17:31:43+5:30

Amazon Marketplace Fee: ग्राहकांना थोडासा भुर्दंड बसणार असला तरी अ‍ॅमेझॉन कंपनीला अब्जावधींचा फायदा होणार आहे. 

Amazon Marketplace Fee: Expensive, online shopping is expensive! Order anything from Amazon, you will be charged extra 5 Rs every time | महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार

महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार

जगप्रसिद्ध ऑनलाईन शॉपिंग कंपनी अ‍ॅमेझॉनने नवा नियम लागू केला आहे. यावरून कितीही रुपयांची ऑर्डर असली तरी प्रत्येक ऑर्डरमागे ५ रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे. ब्‍ल‍िंकिट, स्‍विगी सारख्या प्लॅटफॉर्मवर हे शुल्क आधीपासूनच घेतले जात आहे, ते आता अ‍ॅमेझॉनदेखील वसूल करू लागले आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार अ‍ॅमेझॉनने हे शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे. ५ रुपये आकारल्यामुळे आपला प्लॅटफॉर्म चालू ठेवण्यास मदत मिळणार असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. या शुल्काला मार्केटप्लेस शुल्क असे म्हटले जाते. 

प्रत्येक ऑर्डरवेळी तुम्हाला बिलामध्ये ५ रुपयांचे हे मार्केटप्लेस शुल्क दिसणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता प्रत्येक ऑर्डरसाठी ५ रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. अनेक ठिकाणी अॅपवरून पेमेंट करतेवेळी, बिल भरताना तुम्हाला प्लॅटफॉर्म फी आकारली जाते. हे देखील तसेच शुल्क असणार आहे. यामुळे ग्राहकांना थोडासा भुर्दंड बसणार असला तरी अ‍ॅमेझॉन कंपनीला अब्जावधींचा फायदा होणार आहे. 

एका अहवालानुसार भारतात अ‍ॅमेझॉनवरून सरासरी २६ लाख ऑर्डर दिल्या जातात. म्हणजेच अ‍ॅमेझॉनच्या खात्यात दिवसाला सरासरी १.३० कोटी रुपये जादाचे जमा होणार आहेत. आता याचीच री फ्लिपकार्ट, मंत्रा, मिशो सारख्या कंपन्या ओढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास या कंपन्यांना मोठा महसूल गोळा करण्यास आयती संधी मिळणार आहे. 

Web Title: Amazon Marketplace Fee: Expensive, online shopping is expensive! Order anything from Amazon, you will be charged extra 5 Rs every time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.