Airtel Service Down : देशातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलची सेवा गुरुवारी दुपारी अचानक ठप्प झाली. यानंतर युजर्स एअरटेलच्या अनेक सेवांचा वापर करू शकले नाहीत. या बिघाडामुळे अनेक ग्राहकांना मोबाइल आणि ब्रॉडबँड सेवेचा वापर करता आला नाही.
आउटेजवर लक्ष ठेवणाऱ्या डाऊनडिटेक्टर या वेबसाईटने या आउटेजला दुजोरा दिला आहे. आपण खालील फोटोवरून आउटेजची स्थिती देखील तपासू शकता. मोबाइल सेवा आणि ब्रॉडबँड सेवेत अडचणी आल्याचं अनेकांनी सांगितलं. सकाळी अकराच्या आसपास या आऊटेजची सुरुवात झाली. मात्र, कंपनीनं तात्काळ त्यात सुधारणा केली. या बिघाडामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
एअरटेलचे कोट्यवधी ग्राहक
देशात एअरटेलचे कोट्यवधी ग्राहक आहेत. कंपनी मोबाइल सेवांपासून ब्रॉडबँड सेवांपर्यंत अनेक सेवा पुरवते. आज सेवा बंद झाल्यानंतर अनेकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. परंतु याचा परिणाम संपूर्ण भारतातील सेवांवर झाला नाही.
नो सिग्नलची समस्या
अनेक युजर्सनं आपल्या मोबाइलवर नो सिग्नलची समस्या येत असल्याचं म्हटलं. यानंतर त्याच्या मोबाइलमधून नो मेसेज गेला ना कोणता कॉल. याचा परिणाम देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये दिसून आला.