Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel चा नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार ५०जीबी डेटा, आणखी काय आहे खास?

Airtel चा नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार ५०जीबी डेटा, आणखी काय आहे खास?

Airtel Recharge Plan: भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलसोबत जोडले गेले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:54 IST2025-04-16T14:40:20+5:302025-04-16T14:54:37+5:30

Airtel Recharge Plan: भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलसोबत जोडले गेले आहेत.

Airtel s new recharge plan 50GB data will be available for less than Rs 500 what else is special know details | Airtel चा नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार ५०जीबी डेटा, आणखी काय आहे खास?

Airtel चा नवा रिचार्ज प्लान; ५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळणार ५०जीबी डेटा, आणखी काय आहे खास?

Airtel Recharge Plan: भारती एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलसोबत जोडले गेले आहेत. एअरटेलचे सध्या देशात सुमारे ३८ कोटी युजर्स आहेत. एअरटेल आपल्या युजर्ससाठी स्वस्त आणि मस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. यासोबतच एअरटेल आपल्या युजर्ससाठी अनेक ऑफरही ऑफर देते. एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रकारचे रिचार्ज प्लान आहेत, जे ग्राहकांना खूप आवडतात.

एअरटेलने आणला नवा रिचार्ज प्लान

एअरटेलने एक नवा रिचार्ज प्लान आणला आहे, ज्यामुळे लाखो युजर्स खूश झालेत. एअरटेलचा नवा रिचार्ज प्लान हा अत्यंत परवडणारा रिचार्ज प्लान आहे. या प्लानची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड बेनिफिट्सचा फायदा मिळेल. एअरटेलचा नवा रिचार्ज प्लान तुम्ही ४५१ रुपयांत खरेदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया प्लानमध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी.

धावत्या ट्रेनमध्ये काढता येणार पैसे, राज्यातील 'या' ट्रेनमध्ये ATM ची सुविधा

एअरटेलचा ४५१ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलचा ४५१ रुपयांचा प्लान हा एअरटेलचा डेटा व्हाउचर प्लॅन आहे. जर तुम्हाला हा प्लान खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे आधीपासूनच दुसरा अॅक्टिव्ह प्लान असणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला संपूर्ण ९० दिवसांसाठी म्हणजेच ३ महिन्यांसाठी जिओ हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. जिओ हॉटस्टारवर तुम्ही क्रिकेट, चित्रपट आणि वेब सीरिजचा ही आनंद घेऊ शकता.

Web Title: Airtel s new recharge plan 50GB data will be available for less than Rs 500 what else is special know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल