free jio hotstar : तुम्ही आयपीएलचे चाहते असाल तर एअरटेल तुमच्यासाठी भन्नाट ऑफर घेऊन आले आहे. एअरटेलने आपल्या यूजर्सला खूश करण्यासाठी खास रिचार्ज प्लॅन आणला आहे. एअरटेलचा हा नवीन रिचार्ज प्लॅन क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास आहे. कारण यामध्ये युजर्सना कमी किमतीत चांगले फायदे मिळणार आहेत. यासोबत तुम्ही Jio Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळवू शकता.
एअरटेलने नवीन ३०१ रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर केला आहे. २२ मार्चपासून देशात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेला डोळ्यांसमोर ठेवत एअरटेलने ही खास ऑफर आणली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत Jio Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये तुम्ही ३ महिने आयपीएल सामन्यांचा आनंद लुटू शकता.
एअरटेलचा ३०१ रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा ३०१ रुपयांचा प्लान २९ दिवसांच्या वैधतेसह येतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. यासोबतच तुम्हाला दररोज १०० मोफत एसएमएसचाही लाभ मिळतो. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये दररोज १GB डेटा मिळतो म्हणजेच एकूण २८ GB डेटाचा लाभ या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे.
जिओ हॉटस्टार ३ महिन्यांसाठी मोफत
एअरटेलच्या या प्लानची सर्वात खास गोष्ट म्हणजे Jio Hotstar चे सबस्क्रिप्शन. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना ३ महिन्यांसाठी Jio Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
२२ मार्चपासून आयपीएलची सुरुवात
आयपीएलची २०२५ ची सुरुवात २२ मार्चपासून गतविजेत्या केकेआर विरुद्ध आरसीबी या सामन्याने कोलकाता येथे झाली. या सामन्यात आरसीबीने गतविजेता कोलकातावर विजय मिळवला. केकेआरने आरसीबीला विजयासाठी १७५ धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान १६.२ ओव्हरमध्ये ३ विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. आरसीबीसाठी विराट कोहली याने विजयात प्रमुख भूमिका बजावली. विराटने नाबाद ५९ धावा केल्या. तर फिलीप सॉल्ट याने ५६ धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार रजत पाटीदार याने १६ बॉलमध्ये ३४ धावांची झंझावाती खेळी केली.