Lokmat Money > बिझनेस न्यूज > Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

Airtel Recharge Plan: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलशी कनेक्ट झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:00 IST2025-08-22T15:00:35+5:302025-08-22T15:00:35+5:30

Airtel Recharge Plan: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलशी कनेक्ट झाले आहेत.

Airtel has made a big change in its cheap recharge plan you will get less data than before see details | Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

Airtel Recharge Plan: एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. रिलायन्स जिओपाठोपाठ देशातील बहुतांश मोबाइल युजर्स एअरटेलशी कनेक्ट झाले आहेत. एअरटेल आपल्या ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लानही ऑफर करते. एअरटेलकडे सर्व प्रकारच्या युजर्ससाठी सर्व प्रकारचे रिचार्ज प्लान आहेत, पण आता एअरटेलनं आपल्या एका स्वस्त रिचार्ज प्लानचे फायदे कमी केले आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही एअरटेल युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. चला जाणून घेऊया.

एअरटेलनं आपल्या स्वस्त १९५ रुपयांच्या प्लानच्या बेनिफिट्समध्ये मोठे बदल केले आहेत, त्यानंतर आता युजर्संना या प्लानमध्ये पूर्वीपेक्षा कमी बेनिफिट्सचा फायदा मिळणार आहे.

२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?

एअरटेलचा १९५ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलचा १९५ रुपयांचा प्लान डेटा व्हाउचर प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्संना फक्त डेटाचा फायदा मिळतो. या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे, ज्यामध्ये युजर्संना आधी १५ जीबी डेटाचा फायदा मिळत होता. नव्या बदलानंतर आता युजर्संना या प्लानमध्ये ३० दिवसांच्या वैधतेसाठी १२ जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. डेटा बेनिफिट्ससोबतच युजर्संना ९०दिवसांसाठी जिओ हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन आणि एअरटेल एक्सट्रीमचे प्रीमियम प्ले देखील मिळतं, ज्यामध्ये युजर्स २२ पेक्षा जास्त ओटीटीचा लाभ घेऊ शकतात.

एअरटेलचा डेटा व्हाउचर प्लॅन

एअरटेल आपल्या युजर्संना १९५ रुपयांच्या व्यतिरिक्त अन्य डेटा व्हाऊचर प्लान्सही ऑफर करते. यामध्ये एअरटेलचा १०० रुपयांचा स्वस्त प्लानही आहे, यात युजर्सना ३० दिवसांची वैधता मिळते आणि ५ जीबी डेटा दिला जातो.

Web Title: Airtel has made a big change in its cheap recharge plan you will get less data than before see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल