Lokmat Money > बिझनेस न्यूज > किचननंतर आता बाथरूमपर्यंत पोहोचली महागाई, कंपन्यांनी साबणाच्या किंमतीही वाढवल्या

किचननंतर आता बाथरूमपर्यंत पोहोचली महागाई, कंपन्यांनी साबणाच्या किंमतीही वाढवल्या

स्वयंपाकघरानंतर म्हणजे स्वयंपाकाचं तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळं यांच्यापाठोपाठ महागाई आता बाथरूमपर्यंत पोहोचलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 13:48 IST2024-11-30T13:48:29+5:302024-11-30T13:48:39+5:30

स्वयंपाकघरानंतर म्हणजे स्वयंपाकाचं तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळं यांच्यापाठोपाठ महागाई आता बाथरूमपर्यंत पोहोचलीये.

After the kitchen now the inflation has reached the bathroom skin care product companies have also increased the prices of soap | किचननंतर आता बाथरूमपर्यंत पोहोचली महागाई, कंपन्यांनी साबणाच्या किंमतीही वाढवल्या

किचननंतर आता बाथरूमपर्यंत पोहोचली महागाई, कंपन्यांनी साबणाच्या किंमतीही वाढवल्या

स्वयंपाकघरानंतर म्हणजे स्वयंपाकाचं तेल, पीठ, डाळी, भाजीपाला, फळं यांच्यापाठोपाठ महागाई आता बाथरूमपर्यंत पोहोचलीये. ही काही गंमतीची गोष्ट नाही. चालू तिमाहीत आंघोळीच्या साबणाच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. किंबहुना ज्या पाम तेलापासून साबण तयार केला जातो. त्याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे साबणाच्या निर्मिती खर्चात वाढ झाली. ज्यामुळे देशातील एफएमसीजी कंपन्यांनी आंघोळीच्या साबणाच्या किंमतीत वाढ केली आहे.

दैनंदिन वापरातील उत्पादक एचयूएल आणि विप्रोसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी पाम तेलाच्या दरवाढीचा परिणाम भरून काढण्यासाठी साबणाच्या किमती तब्बल ७ ते ८ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. साबण उत्पादनांसाठी पाम तेल हा एक प्रमुख कच्चा माल आहे. अनियमित हवामानामुळे उत्पादन घटल्यानं एचयूएल आणि टाटा कन्झ्युमर सारख्या कंपन्यांनीही अलीकडे चहाच्या दरात वाढ केली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या निकालादरम्यान अनेक लिस्टेड कंपन्यांनी आपले मार्जिन वाचविण्यासाठी चालू तिमाहीत साबणाच्या किंमतीत वाढ करण्याचे संकेत दिले. या कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोको सारख्या गोष्टीतील वाढलेल्या किंमतीचा सामना करावा लागत आहे. 

का झाली वाढ?

"साबण निर्मितीतील प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून त्यात ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. परिणामी, सर्व प्रमुख कंपन्यांनी ही वाढ अंशत: भरून काढण्यासाठी सुमारे ७ ते ८ टक्क्यांनी किंमती वाढवल्या आहेत," अशी प्रतिक्रिया विप्रो कन्झ्युमर केअरचे सीईओ नीरज खत्री यांनी दिली. अझीम प्रेमजी यांच्या विप्रो एंटरप्रायझेसचे युनिट असलेल्या विप्रोकडे संतूरसारख्या ब्रँडची मालकी आहे.

देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडनंही चहा आणि स्किन क्लिंजर उत्पादनांच्या किंमतीत वाढ केली आहे. यामध्ये डव्ह, लक्स, लाईफबॉय, लिरिल, पियर्स, रेक्सोना आदी ब्रँडअंतर्गत साबणाच्या व्यवसायाचा समावेश आहे. आयात शुल्क वाढीसह जागतिक किमती वाढल्यानं सप्टेंबरच्या मध्यापासून पाम तेलाच्या किमती तब्बल ३५ ते ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

पाम तेल कुठून आयात होतं?

पाम तेल प्रामुख्यानं इंडोनेशिया आणि मलेशियातून आयात केलं जातं. सध्या पाम तेलाचा दर १३७० रुपये प्रति १० किलो आहे. याशिवाय एचयूएलच्या इतर पर्सनल केअर प्रॉडक्ट्सच्या किमतीही वाढल्या आहेत, अशी माहिती एका वितरकानं दिली. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचे कार्यकारी संचालक (संशोधन) अबनीश रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, एचयूएलनंतर आता बहुतांश कंपन्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे.

Web Title: After the kitchen now the inflation has reached the bathroom skin care product companies have also increased the prices of soap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.