नवी दिल्ली- आयसीआयसीआय बँक खातेधारकांसाठी आता एक गूड न्यूज आहे. तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड असेल. तुम्ही जिओ पोस्टपेड सिम कार्ड खरेदी करत असाल तर तुमच्याही मोठी ऑफर आहे. आयसीआयसीआय बँकेबरोबर रिलायन्स जिओनं नवा करार केला आहे. ज्याच्या अंतर्गत ग्राहकांना खास सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आयसीआयसीआय क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून जिओ सिम खरेदी केल्यास ग्राहकांना 2 महिन्यांची मोफत पोस्टपेड सेवा मिळणार आहे. परंतु त्यासाठी ग्राहकाला माय जिओ अॅपच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. तसेच या योजनेंतर्गत सातव्या पोस्टपेडच्या बिलावर कोणतंही रेंटल द्यावं लागणार नाही. तसेच ग्राहकाला 12 महिन्यांच्या बिल पेमेंटवर कॅशबॅक ऑफरही दिली जाणार आहे.
काय आहे प्लॅन ?
जिओ पोस्टपेड ग्राहकांना सिम घेतल्यानंतर 6 महिने बिल भरावं लागणार आहे. सातव्या महिन्यांनंतर आयसीआयसीआय बँक त्यांना डिस्काऊंट देणार आहे. जर एखादा ग्राहक 12 महिन्यांपर्यंत जिओ पोस्टपेड बिल भरत असेल, तर त्याला आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डावर कॅशबॅकही मिळणार आहे. क्रेडिट कार्डमध्ये जिओ बिल पेमेंटसाठी ऑटो पे ऑप्शन देण्यात आलं आहे. जिओ पोस्टपेड प्लॅन 199 रुपयांपासून सुरू आहेत. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग, 25 जीबी 4जी डेटा आणि 100 एसएमएस रोज मिळतात.
SBIनंतर Jioचा 'या' बँकेशी मोठा करार, मोफत मिळणार अनेक सेवा
आयसीआयसीआय बँक खातेधारकांसाठी आता एक गूड न्यूज आहे. तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड असेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 14:55 IST2018-08-21T14:55:26+5:302018-08-21T14:55:56+5:30
आयसीआयसीआय बँक खातेधारकांसाठी आता एक गूड न्यूज आहे. तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचं क्रेडिट कार्ड असेल.
