lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Paytmवर झालेल्या कारवाईने इतर पेमेंट ॲप्सना 'अच्छे दिन'; धडाधड वाढली डाउनलोडची संख्या

Paytmवर झालेल्या कारवाईने इतर पेमेंट ॲप्सना 'अच्छे दिन'; धडाधड वाढली डाउनलोडची संख्या

Paytm च्या शेअर्समध्येही सातत्याने घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:15 PM2024-02-13T16:15:44+5:302024-02-13T16:17:42+5:30

Paytm च्या शेअर्समध्येही सातत्याने घसरण

Action on Paytm 'good day' to other payment apps; The number of downloads increased dramatically | Paytmवर झालेल्या कारवाईने इतर पेमेंट ॲप्सना 'अच्छे दिन'; धडाधड वाढली डाउनलोडची संख्या

Paytmवर झालेल्या कारवाईने इतर पेमेंट ॲप्सना 'अच्छे दिन'; धडाधड वाढली डाउनलोडची संख्या

Paytm RBI: पेटीएम हे पेमेंट अँप सध्या खूपच वाईट परिस्थितीत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएम कोलमडल्याचं दिसत आहे. शेअर्स सातत्याने घसरताना दिसत आहेत. आता लोक पेटीएम वापरायलाही घाबरतात. अशा परिस्थितीत उर्वरित पेमेंट अँप्सला 'अच्छे दिन' आल्याचे दिसत आहे. PhonePe ते Google Pay आणि इतर पेमेंट वॉलेटचा पर्याय युजर्सना अधिक विश्वासू वाटत असल्याने, ते डाउनलोड करण्याकडे त्यांचा कल असल्याचे दिसत आहे. पेटीएमला बसलेल्या फटक्यामुळे इतर वॉलेटच्या डाउनलोडमध्ये ७६ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

पेटीएम आणि आरबीआयमध्ये पेटीएमचा यूपीआय थर्ड पार्टीकडे हस्तांतरित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. जोपर्यंत यावर कोणताही निर्णय होणार नाही, तोपर्यंत कंपनीचे मोठे नुकसान झालेले असेल. विशेष म्हणजे २९ फेब्रुवारीनंतर पेटीएम वॉलेट पूर्णपणे बंद होणार आहे. UPI देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे UPI सेवा पेटीएम पेमेंट बँकेकडेही होती, त्यावर आरबीआयने कारवाई केली आहे. पेटीएमवर कारवाई झाल्यापासून इतर वॉलेटला पसंती वाढली.

Google Pay, PhonePeच्या डाउनलोडमध्ये वाढ

पेटीएम वरील संकटानंतर PhonePe ला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्याचा डेटा देखील उपलब्ध आहे. ॲप इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म AppTweak च्या डेटानुसार, ३१ जानेवारीपासून PhonePe च्या डाउनलोडमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, जवळपास एका आठवड्यात PhonePe ला Google आणि Apple Play Store वरून 3.75 दशलक्षाहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत. दुसरीकडे, या कालावधीत Google Pay च्या डाउनलोडमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे MobiKwik च्या डाउनलोडमध्येही 100 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत Mobikwik ला 2.80 लाखाहून अधिक डाउनलोड मिळाले आहेत.

पेटीएम पेमेंट बँकेवर कारवाई केल्यानंतर, एअरटेल पेमेंट बँक या संधीचा फायदा घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. जर आपण एअरटेलच्या पेमेंट बँक व्यापाऱ्यांबद्दल बोललो तर १० पेक्षा जास्त गोष्टी लाइव्ह आहेत. मात्र, फोनपे आणि गुगलचे वर्चस्व सातत्याने वाढतच आहे. प्रत्येक महिन्याला, UPI व्यवहाराच्या व्हॉल्यूममध्ये या दोघांचा सरासरी हिस्सा ८० ते ८५ इतका असतो. NPCI च्या मते, डिसेंबर २०२३ मध्ये, UPI व्हॉल्यूममध्ये PhonePe चा वाटा ४६ टक्के होता आणि Google Pay चा वाटा ३६ टक्के होता. तर पेटीएम पेमेंट बँकेचा हिस्सा केवळ १३ टक्के होता.

Web Title: Action on Paytm 'good day' to other payment apps; The number of downloads increased dramatically

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.