Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार

Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार

My Aadhaar App: नवीन आधार ॲपमध्ये मिळणार सुविधा; कोणत्याही कागदपत्रांंची गरज नाही ; लाखो लोकांचा वेळ वाचणार; ज्येष्ठ नागरिकांना ठरणार फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 07:33 IST2025-12-04T07:29:05+5:302025-12-04T07:33:42+5:30

My Aadhaar App: नवीन आधार ॲपमध्ये मिळणार सुविधा; कोणत्याही कागदपत्रांंची गरज नाही ; लाखो लोकांचा वेळ वाचणार; ज्येष्ठ नागरिकांना ठरणार फायदेशीर

Aadhar Card Update: Now update at home 'Aadhaar', name, mobile, address can be changed at home | Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार

Aadhar Card Update: आता घरबसल्या अपडेट करा 'आधार', नाव, मोबाइल, पत्ता घरीच बदलता येणार

My Aadhaar Update: नवी दिल्ली : तुम्ही आता घरबसल्या तुमच्या आधारकार्डवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलू शकता. सरकारने नवीन आधार ॲपमध्ये ही सुविधा दिली आहे. त्याचवेळी तुमचा पत्ता, नाव आणि ई-मेल आयडी अपडेट करण्याची सुविधाही लवकरच मिळणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय)ने ही नवीन डिजिटल सेवा जाहीर केली आहे.

वापरकर्त्यांना हे बदल करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. ॲपवरील ओटीपी पडताळणी आणि फेस ऑथेटिकेशनद्वारे सर्व काही बदलता येणार आहे. ही सेवा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि स्थलांतरितांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

एक महिन्यापूर्वी, यूआयडीएआयने आधारसाठी एक नवीन मोबाइल ॲप लाँच केले. वापरकर्ते एकाच फोनवर पाच जणांच्या आधारची माहिती ठेवू शकतात.

ॲपमध्ये मोबाइल नंबर कसा अपडेट केला जाईल? 

पिन टाकून ॲपमध्ये लॉगिन करा. स्क्रोल करून खाली जा, सर्व्हिसेस अंतर्गत माय आधार अपडेटवर क्लिक करा.

नंबर अपडेट करण्याचा पहिला पर्याय दिसेल; त्यावर क्लिक करा.

सध्याचा मोबाईल नंबर एंटर करा, ओटीपी व्हेरिफाय करा.नवीन मोबाईल नंबर एंटर करा, ओटीपी व्हेरिफाय करा. 

यानंतर फेस ऑथेंटिकेशन होईल; कॅमेऱ्यात पहा व एकदा डोळे बंद करा. यानंतर पेमेंट पर्याय दिसेल; ७५ रुपये जमा केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

नवीन फिचर्स काय? 

ई-आधार नेहमी तुमच्यासोबत राहील. झेरॉक्सची गरज नाही. आयडी शेअर करण्यासाठी चेहरा स्कॅन करावा लागेल. ॲप बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह उघडते. इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध. इंटरनेट नसतानाही तुम्ही तुमचा आधार पाहू शकता.

नेमके काय होणार? 

ॲपद्वारे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया सोपी आहे. कोणतेही कागदपत्रे, प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत होईल. जर तुम्ही ॲप डाउनलोड केले नसेल, तर तुम्हाला ते डाउनलोड करावे लागेल. 

येथे, वापरकर्त्यांना त्यांचा आधार क्रमांक टाकून लॉग इन करावे लागेल. यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल, व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतर ६ अंकी लॉगिन पिन सेट करावा लागेल.

आधार मोबाइल अपडेट का आवश्यक आहे?
 
आधार कार्ड ही देशातील सर्वात मोठी ओळख सेवा आहे. मोबाईल नंबर हा यात सर्वांत महत्वाचा घटक आहे, कारण तो ओटीपीद्वारे बँक खाती, सरकारी अनुदाने, आयकर पडताळणी आणि डिजीलॉकरसारख्या डिजिटल सेवांमध्ये प्रवेश प्रदान करतो.

जर नंबर जुना झाला किंवा हरवला तर त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पूर्वी तो अपडेट करण्यासाठी आधार केंद्रात जावे लागत असे, त्यात बायोमेट्रिक पडताळणीचा त्रास आणि लांब रांगा असायच्या. मात्र, यूआयडीएआयने आता ही प्रक्रिया डिजिटल पद्धतीने सोपी केली आहे.

Web Title : आधार कार्ड अपडेट: नाम, पता, मोबाइल नंबर अब घर बैठे बदलें!

Web Summary : यूआईडीएआई ने मोबाइल ऐप से आधार अपडेट करने की सुविधा दी। अब घर बैठे मोबाइल नंबर, पता, नाम और ईमेल बदलें। ओटीपी और फेस ऑथेंटिकेशन से बिना कागजात बदलाव संभव। सेवाओं तक पहुंच आसान।

Web Title : Update Aadhaar card details: Name, address, mobile number at home!

Web Summary : UIDAI enables online Aadhaar updates via a new mobile app. Users can now change their registered mobile number, and soon address, name, and email, without documents, using OTP and face authentication. Simplifies access to essential services.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.