Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक

रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक

जर योग्य वेळी, योग्य नियोजन केले, तर निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी दरमहा पुरेसे ठरेल एवढे  उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:38 IST2026-04-06T12:35:56+5:302026-04-06T12:38:48+5:30

जर योग्य वेळी, योग्य नियोजन केले, तर निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी दरमहा पुरेसे ठरेल एवढे  उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे...

A sure arrangement of Rs 50000 per month after retirement! Invest smartly in this way for a secure future | रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक

रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक

निवृत्तीचा विचार सुरू झाला की, निवृत्तीनंतर काय? निवृत्तीकाळात दर महा पैसा कुठूण येणार? आपल्या आर्थिक गरजा कशा पूर्ण कारयाच्या? केलेली बचत पुरेशी ठरेल का? असे अनेक प्रश्न मनात उभे ठाकतात. मात्र, जर योग्य वेळी, योग्य नियोजन केले, तर निवृत्तीनंतरही सन्मानाने जगण्यासाठी दरमहा पुरेसे ठरेल एवढे  उत्पन्न मिळवणे सहज शक्य आहे.

लवकर गुंतवणूक सुरू करण्याचे फायदे -
जर तुमचे ध्येय निवृत्तीनंतर दरमहा ५०,००० रुपये मिळवण्याचे असेल, तर त्याची तयारी आत्तापासूनच करणे आवश्यक आहे.  विशेषतः वयाच्या २५ व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केल्यास 'कम्पाऊंडिंग'चा अर्थात चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळू शकतो. यात तुमच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळते, ज्यामुळे दीर्घकाळात एक मोठी रक्कम उभी राहते.

या पर्यायांसदर्भात करू शकता विचार -
आजच्या महागाईच्या कालात केवळ एफडी अथवा सोन्यात गुंतवणूक करणे पुरेसे नाही. तर महागाईचा दर पाहता, आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता असणे आवश्यक आहे. यात इक्विटी म्युच्युअल फंड, पीपीएफ (PPF) आणि एनपीएस (NPS) यांसारख्या पर्यायांचा समावेश असावा. इक्विटी दीर्घकाळात चांगला परतावा देते, तर पीपीएफ आणि एनपीएस गुंतवणुकीला सुरक्षितता प्रदान करतात.

SWP पद्धतीने मिळवा पेन्शन -
जर निवृत्तीच्या वेळी तुमच्याकडे साधारण १.५ कोटी रुपयांचा निधी जमा झाला, तर 'सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन' (SWP) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या पद्धतीत तुमची मूळ रक्कम गुंतवलेली राहते आणि तुम्हाला दरमहा ५०,००० रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत राहते. तसेच, एनपीएसमधील गुंतवणूक आणि म्युच्युअल फंडातील परतावा यांवरील टॅक्सचे नियम समजून घेतल्यास अधिक फायदा होतो. अर्थात, वेळेवर केलेल्या नियोजनाने निवृत्तीनंतरचे आयुष्य अथवा भविष्य सुखकर आणि सुरक्षित होऊ शकते

 

Web Title : रिटायरमेंट के बाद ₹50,000 मासिक: स्मार्ट निवेश योजनाएँ

Web Summary : जल्दी निवेश शुरू करें, इक्विटी म्यूचुअल फंड, पीपीएफ और एनपीएस जैसे विकल्पों के साथ अपने पोर्टफोलियो में विविधता लाएं। एसडब्ल्यूपी ₹1.5 करोड़ के कोष से ₹50,000 मासिक आय प्रदान कर सकता है, जिससे आरामदायक सेवानिवृत्ति सुनिश्चित होती है।

Web Title : Secure ₹50,000 Monthly Post-Retirement: Smart Investment Strategies

Web Summary : Start investing early, diversify your portfolio with options like equity mutual funds, PPF, and NPS. SWP can provide ₹50,000 monthly income from a ₹1.5 crore corpus, ensuring a comfortable retirement.