YRF Uday Chopra Networth: माया नगरी मुंबईमध्ये अनेक लोक आपलं करिअर घडवायला आणि नशीब आजमावण्यासाठी येतात. काही लोकांना अभिनय क्षेत्रात यश मिळतं, तर काही जण अनेक वर्षे संघर्ष करत राहतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याची गोष्ट सांगणार आहोत, ज्याचे वडील एक यशस्वी लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत, तरीही या अभिनेत्याला चित्रपटसृष्टीत यश मिळालं नाही. या अभिनेत्यानं चित्रपट तर खूप केले पण ते बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकले नाहीत. हा अभिनेता म्हणजे यश चोप्रा यांचा मुलगा उदय चोप्रा.
मोठ्या पडद्यावर फ्लॉप, पण व्यवसायात कमाल
बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मुलगा असूनही उदय चोप्रा मोठ्या पडद्यावर फारशी कमाल दाखवू शकला नाही. तसं पाहिलं तर, त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केली होती. यानंतर त्यांनं अनेक चित्रपटांमध्ये कामही केलं. त्याला त्याचा भाऊ आदित्य चोप्रा यानं लॉन्च केलं होतं. उदय चोप्रा चित्रपटांमध्ये यशस्वी होऊ शकला नसला तरी, त्याची नेटवर्थ ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि तो दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावतात.
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
यश चोप्रा यांच्या कमाईतून सुरुवात
चित्रपटसृष्टीत काम झालं नाही, तेव्हा उदय चोप्रा यांनी व्यवसायाच्या (Business) जगाकडे आपला मोर्चा वळवला. तो वायआरएफ एंटरटेनमेंटचे (YRF Entertainment) सीईओ म्हणून काम करतो. या कंपनीची सुरुवात त्याचे वडील यश चोप्रा यांनी केली होती, ज्याचं मूल्य १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या कंपनीव्यतिरिक्त उदय चोप्रा याचे अनेक व्यावसायिक उपक्रम आहेत, ज्यात टेक गुंतवणूक आणि योमिक्स (Yomics) नावाची कॉमिक कंपनी देखील समाविष्ट आहे. तो धूम फ्रँचायझीचाही एक भाग आहेत.
एकही हिट नाही
तसं पाहिलं तर, उदय चोप्रा यांनं जवळपास ११ चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण तो आपल्या एकट्याच्या बळावर एकही चित्रपट हिट करू शकला नाही. मात्र, 'प्यार इम्पॉसिबल', 'नील अँड निक्की' आणि 'मेरे यार की शादी' यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्याच्या अभिनयाला चांगली पसंती मिळाली. चित्रपटसृष्टीत यशस्वी न होऊ शकलेला उदय चोप्रा आज व्यवसाय जगात यशस्वी होऊन आलिशान आयुष्य जगत आहेत. कमाईच्या बाबतीतही त्यांनं अनेक अभिनेत्यांना मागे टाकलंय आहे. तो आपल्या वडिलांचा व्यवसाय मोठ्या समजूतदारपणे पुढे नेत आहे.