Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जुन्या पेन्शनधारकांनाही ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण

जुन्या पेन्शनधारकांनाही ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण

8th Pay Commission Update : सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना अधिसूचित केली. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत निवृत्त होणाऱ्यांना नवीन पेन्शन सुधारणेचा समावेश होईल का, असा प्रश्न लाखो पेन्शनधारकांना पडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 13:08 IST2026-02-15T12:21:40+5:302026-02-15T13:08:32+5:30

8th Pay Commission Update : सरकारने ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आठव्या वेतन आयोगाची स्थापना अधिसूचित केली. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत निवृत्त होणाऱ्यांना नवीन पेन्शन सुधारणेचा समावेश होईल का, असा प्रश्न लाखो पेन्शनधारकांना पडला आहे.

8th Pay Commission Update Pension Revision Benefits for Pre-2026 Retirees Confirmed | जुन्या पेन्शनधारकांनाही ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण

जुन्या पेन्शनधारकांनाही ८ व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण

8th Pay Commission Update : केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना काढल्यापासून देशातील लाखो पेन्शनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन सुधारणेचा लाभ मिळणार की नाही, या प्रश्नाने पेन्शनधारकांना ग्रासले होते. मात्र, आता स्वतः वित्त मंत्रालयाने लोकसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिल्याने लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जुन्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी
'फायनान्स ॲक्ट २०२५' मुळे पेन्शन नियमांमध्ये काही बदल झाल्याने, नवीन आणि जुन्या पेन्शनधारकांमध्ये सरकार भेदभाव करणार का, अशी भीती व्यक्त केली जात होती. यावर संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ८ व्या वेतन आयोगाला केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारावरच नव्हे, तर पेन्शनधारकांच्या पेन्शनवरही शिफारसी देण्याचे काम सोपवण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, ३१ डिसेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले सर्व केंद्रीय कर्मचारी या नवीन आयोगाच्या शिफारसींनुसार पेन्शन वाढीसाठी पात्र असतील.

नियमांची चौकट आणि अंमलबजावणी
पेन्शनमधील बदल हे केंद्र सरकारच्या सामान्य आदेशाद्वारे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील नियमांचा आधार घेतला जातो.
सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (पेन्शन) रूल्स, २०२१
सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (एक्स्ट्राऑर्डिनरी पेन्शन) रूल्स, २०२३
वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्यानंतर, या नियमांच्या चौकटीत राहून पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे जुन्या पेन्शनधारकांनी काळजी करण्याचे कारण नाही, असे सरकारने अधोरेखित केले आहे.

वाचा - शेअर बाजारात श्रीमंत व्हायचेय? जगातील दिग्गज फंड मॅनेजरने सांगितले सामान्य माणूस कुठे चुकतो?

८ व्या वेतन आयोगाचे महत्त्व
३ नोव्हेंबर २०२५ रोजी या आयोगाची स्थापना झाली असून, हा आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन या तीनही प्रमुख मुद्द्यांवर आपला अहवाल सादर करेल. महागाईचा वाढता दर आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन हा आयोग आपल्या शिफारसी देईल, ज्यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक फायदा होणार आहे.
 

Web Title : पुराने पेंशनरों को भी 8वें वेतन आयोग का लाभ? वित्त मंत्रालय का स्पष्टीकरण

Web Summary : पुराने पेंशनरों को 8वें वेतन आयोग का लाभ मिलेगा। वित्त मंत्रालय ने स्पष्ट किया कि सिफारिशें 31 दिसंबर 2025 से पहले सेवानिवृत्त लोगों तक भी विस्तारित हैं, जिससे पेंशन संशोधन और वित्तीय लाभ सुनिश्चित होंगे।

Web Title : 8th Pay Commission benefits for old pensioners? Finance Ministry clarifies.

Web Summary : Old pensioners will benefit from the 8th Pay Commission. The Finance Ministry clarified that recommendations extend to those retired before December 31, 2025, addressing concerns about pension revisions and assuring financial benefits.