Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा

८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा

8th Pay Commission: ८ व्या वेतन आयोगामध्ये, वेतनवाढीची संपूर्ण यंत्रणा 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असते. सद्यस्थितीत, सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:18 IST2026-03-24T17:18:25+5:302026-03-24T17:18:25+5:30

8th Pay Commission: ८ व्या वेतन आयोगामध्ये, वेतनवाढीची संपूर्ण यंत्रणा 'फिटमेंट फॅक्टर'वर अवलंबून असते. सद्यस्थितीत, सरकारने ८ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही.

8th Pay Commission Update Central Employees Expecting Up to ₹15 Lakh Arrears | ८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा

८ व्या वेतन आयोगात किमान पगार ५४ हजार होण्याची शक्यता; थकबाकीचा आकडाही थक्क करणारा

8th Pay Commission : देशातील लाखो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित ८ वा वेतन आयोग आपल्या शिफारसींना अंतिम रूप देण्याच्या जवळ असून, लवकरच कर्मचाऱ्यांच्या पदरात घसघशीत वेतनवाढ पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, नव्या आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांना ३.६ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंतची थकबाकी मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

२० महिन्यांचे 'एरिअर' आणि आर्थिक दिलासा
अहवालानुसार, ८ व्या वेतन आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०२६ पासूनची थकबाकी दिली जाईल. जर आयोगाच्या शिफारसी लागू होण्यास वेळ लागला, तर साधारण २० महिन्यांचे प्रलंबित एरिअर कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनावर अवलंबून असेल, जी किमान ३.६ लाख रुपयांपासून सुरू होऊन १५ लाख रुपयांपर्यंत असू शकते.

पगाराचे गणित बदलणार?

  • नव्या वेतन आयोगामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका 'फिटमेंट फॅक्टर' बजावणार आहे.
  • ७ वा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता, ज्यामुळे किमान वेतन १८,००० रुपये झाले होते.
  • ८ व्या आयोगाची मागणी : महागाई आणि वाढता राहणीमानाचा खर्च पाहता कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर ३.० ते ३.२५ पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.
  • जर ही मागणी मान्य झाली, तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून थेट ५४,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

थकबाकी कधीपासून लागू होणार?
७ व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपला आहे. त्यामुळे, ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू मानल्या जातील. नवीन वेतन आयोग अधिकृतपणे कधीही लागू झाला, तरी कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२६ पासूनचा सर्व फरक 'एरिअर' म्हणून दिला जाईल.

वाचा - बाजारात 'ट्रम्प' कार्ड चाललं! सेन्सेक्स १३७२ अंकांनी उसळला, निफ्टी २३ हजारांच्या उंबरठ्यावर

सरकारने मागवली कर्मचाऱ्यांची मते
प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारने MyGov पोर्टलवर कर्मचाऱ्यांकडून सूचना आणि फीडबॅक मागवला आहे. यासाठीची अंतिम मुदत आता ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अद्याप सरकारकडून अधिकृत अधिसूचना जारी झालेली नसली तरी, पुढील १४ ते १८ महिन्यांत आयोग आपला अहवाल सादर करेल अशी चिन्हे आहेत.
 

Web Title : 8वां वेतन आयोग: वेतन ₹54,000 होने की संभावना, बकाया राशि चौंकाने वाली

Web Summary : 8वें वेतन आयोग से केंद्रीय कर्मचारियों के वेतन में वृद्धि की संभावना है। बकाया राशि ₹3.6 से ₹15 लाख तक हो सकती है। फिटमेंट फैक्टर महत्वपूर्ण है; संभावित वृद्धि से न्यूनतम वेतन ₹54,000 तक बढ़ सकता है। सिफारिशें जनवरी 2026 तक अपेक्षित हैं।

Web Title : 8th Pay Commission: Salary Likely ₹54,000, Arrears a Staggering Amount

Web Summary : Central government employees may receive substantial salary hikes with the 8th Pay Commission. Arrears could range from ₹3.6 to ₹15 lakh. The fitment factor is crucial; a potential increase to 3.0-3.25 could raise the minimum salary to ₹54,000. Recommendations are expected by January 2026.