Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:59 IST2025-08-20T13:59:26+5:302025-08-20T13:59:26+5:30

जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

600 people are buying maruti suzuki fronx suv every day price rs 7 58 lakhs down payment of 2 lakhs how much will be the monthly EMI | ₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जर तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि तुम्ही मारुती सुझुकी फ्रॉन्क्सबद्दल (Maruti Suzuki Fronx) विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही ४ मीटरपेक्षा कमी लांबीची एसयूव्ही आहे. खरं तर, गेल्या २८ महिन्यांत, मारुती सुझुकी फ्रॉन्क्सला ५ लाख ग्राहक मिळाले आहेत, म्हणजेच दररोज सुमारे ५८८ लोक मारुती सुझुकी फ्रॉन्क्स खरेदी करत आहेत. यासोबतच, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स भारतातील टॉप १० सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत देखील सामील झाली आहे.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची किंमत

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सच्या किमतीबद्दल बोलायचं झालं तर, या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत ७.५८ लाख रुपयांपासून सुरू होते. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १३.०६ लाख रुपये आहे. जर तुम्ही मारुती सुझुकी फ्रॉन्क्सचा बेस व्हेरिएंट खरेदी केला तर नोंदणी आणि इतर शुल्कांसह, या कारची किंमत तुम्हाला एकूण ८.६३ लाख रुपये लागू शकते.

ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण

फ्रॉन्क्सचा मंथली ईएमआय

मारुती सुझुकी फ्रॉन्क्ससाठी २ लाख रुपयांचं डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून ६.६३ लाख रुपयांचं लोन घ्यावं लागेल. जर तुम्हाला हे कर्ज ५ वर्षांसाठी ९ टक्के दरानं मिळालं तर, तुम्हाला दरमहा १३,७६३ रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील.

दरमहा १३,७६३ रुपये ईएमआय म्हणून भरून, तुम्ही ५ वर्षांत बँकेला एकूण ८.२५ लाख रुपये द्याल. यापैकी फक्त १.६२ लाख रुपये तुमचे व्याज असेल. अशा परिस्थितीत, या कारसाठी तुम्हाला १.६२ लाख रुपये अधिक व्याजाच्या स्वरुपात खर्च करावे लागतील.

Web Title: 600 people are buying maruti suzuki fronx suv every day price rs 7 58 lakhs down payment of 2 lakhs how much will be the monthly EMI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.