लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : मार्च २०२५ च्या अखेरीस भारतीय घरगुती कर्ज जीडीपीच्या ४१.३ टक्के पर्यंत वाढले आहे. हे पाच वर्षांच्या सरासरी ३८.३ टक्के पेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून ते सातत्याने वाढत आहे.
घरगुती कर्जात या वाढीमध्ये रोजच्या जगण्याशी संबंधित कर्जाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याचा अर्थ असा की भारतीय कुटुंबे संपत्ती वाढीसाठी नव्हे तर त्यांच्या दैनंदिन गरजा, चैनी पूर्ण करण्यासाठी कर्ज घेत आहेत. कर्जात क्रेडिट कार्ड कर्ज व ऑटो कर्ज यासारखी कर्ज ही मोठी आहेत.
क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज वाढली : सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण घरगुती कर्जाच्या ५५.३ टक्के वैयक्तिक कर्ज, ऑटो कर्ज व क्रेडिट कार्ड कर्ज होती. गेल्या ५ वर्षांत हा वाटा वाढला आहे.
कर्जात कोणाचा वाटा किती?
गृह कर्ज ४२.१%
क्रेडिट कार्ड, ऑटो लोन ३३.०%
पर्सनल लोन २२.२%
ॲग्री, बिझनेस लोन १६.१%
