Lokmat Money > बिझनेस न्यूज > ब्रॉडबँड सेवेसाठी हवेत ४.२ लाख कोटी; देशातील २४ कोटी घरांना जोडण्याची गरज

ब्रॉडबँड सेवेसाठी हवेत ४.२ लाख कोटी; देशातील २४ कोटी घरांना जोडण्याची गरज

सध्या सेवा ४ कोटी घरांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 09:47 AM2024-05-15T09:47:07+5:302024-05-15T09:48:16+5:30

सध्या सेवा ४ कोटी घरांमध्ये

4 lakh crore in air for broadband services need to connect 24 crore houses in the country | ब्रॉडबँड सेवेसाठी हवेत ४.२ लाख कोटी; देशातील २४ कोटी घरांना जोडण्याची गरज

ब्रॉडबँड सेवेसाठी हवेत ४.२ लाख कोटी; देशातील २४ कोटी घरांना जोडण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०३० पर्यंत देशातील २४ कोटी घरांना ब्रॉडबँडने जोडण्यासाठी ४.२ लाख कोटी रुपयांची गरज आहे, अशी माहिती ईवाय ग्लोबलने दिली आहे.

'ब्रॉडबँड इंडिया फोरम'ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात 'ईवाय ग्लोबल'चे दूरसंचार प्रमुख तथा भागीदार प्रशांत सिंघल यांनी या कामासाठी किती रुपयांची गरज भासेल याचा आराखडाच सादर केला. सिंघल यांनी सांगितले की, भारतात सध्या ४ कोटी घरे ब्रॉडबँडने जोडलेली आहेत. शहरातील ३.६ कोटी घरांत ब्रॉडबैंड आहे. ग्रामीण भागात मात्र केवळ ३० लाख जोडण्या आहेत. २०३० पर्यंत शहरातील १० कोटी घरांत तर ग्रामीण भागातील १५.३ कोटी घरांत ब्रॉडबँड आवश्यकता आहे.

'ब्रॉडबँड इंडिया फोरम'चे अध्यक्ष टी. व्ही. रामचंद्रन यांनी सांगितले की, देशातील फिक्स्ड ब्रॉडबँडची विद्यमान सुविधा वाढत्या मागणीसोबत ताळमेळ बसविण्यास असमर्थ आहे. आगामी ६ वर्षांत फिक्स्ड ब्रॉडबँड जोडण्यात किमान २० टक्के वार्षिक वृद्धी आवश्यक आहे. अमेरिकेत ९२ टक्के घरांत, चीनमध्ये ९७ टक्के, तर जपानमध्ये ८४ टक्के घरांत ब्रॉडबँड आहे.

कशासाठी किती खर्च येणार?

फायबर अंथरणे - २.७ ते ३ लाख कोटी
पायाभूत सुविधा - ९० ते ९६ हजार कोटी
वायफाय सुविधा - ६,६०० ते ९,००० कोटी
डाटा सेंटर उभारणे - ९,७०० ते १४,१०० कोटी
उपग्रह ब्रॉडबँड सेवा - २६,००० ते २९,००० कोटी

 

Web Title: 4 lakh crore in air for broadband services need to connect 24 crore houses in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.