मुंबई - दळणवळण अर्थात लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात चार वर्षांत ३० लाख नोक-या निर्मित होणार आहेत. यामध्ये मुंबई आघाडीवर असेल. रस्ते उभारणीसह रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न तसेच या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे आगामी काळात यात ‘बूम’ असेल. ‘टीमलीज’ या सर्वेक्षण संस्थेने यासंबंधीचा अभ्यास अहवाल प्रकाशित केला.
या अभ्यासानुसार, २०१७ अखेर या क्षेत्रात १०.९० लाख नोकºया होत्या. केंद्र सरकारकडून लॉजिस्टिक्स क्षेत्रात ६ लाख कोटींची गुंतवणूक होत आहे. खासगी गुंतवणुकीसह या क्षेत्रातील एकूण गुंतवणूक १४.९० लाख कोटी रुपये होत आहे. ती रोजगारवाढीसाठी महत्त्वपूर्ण असेल.
वस्तूंच्या दळणवळण सुविधेत जर्मनी सध्या अव्वल आहे. २०१४ मध्ये भारताचा क्रमांक ५४ वा होता. रस्ते महामार्गांचे जाळे विस्तारत असल्याने २०१७ अखेर ३५ व्या स्थानी आला. लॉजिस्टिक्समधील गुंतवणूक व पर्यायाने रोजगार वाढण्याचे हे एक मुख्य कारण असल्याचे अहवालात नमूद आहे.
संधी दवडू नये
‘जीएसटी, रस्ते उभारणी यामुळे लॉजिस्टिक्सला संजीवनी मिळाली आहे. त्यातून ई-कॉमर्सचा पसारा वाढत असल्याने या क्षेत्राला अधिकच चालना मिळत आहे. आता ही संधी सरकारने सोडू नये. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकºया निर्मित होत असताना भविष्यात लॉजिस्टिक्ससाठी स्वतंत्र मंत्रालयाचीही गरज भासेल. त्यासाठीची तयारी सरकारने आताच सुरू करायला हवी.’
- रितूपर्णा चक्रवर्ती,
सह संस्थापिका, टीमलीज
३० लाख नोकऱ्यांचे ‘दळणवळण’, चार वर्षांत लॉजिस्टिक्सला येणार बूम
दळणवळण अर्थात लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात चार वर्षांत ३० लाख नोक-या निर्मित होणार आहेत. यामध्ये मुंबई आघाडीवर असेल. रस्ते उभारणीसह रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न तसेच या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे आगामी काळात यात ‘बूम’ असेल.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 01:30 IST2018-06-12T01:30:57+5:302018-06-12T01:30:57+5:30
दळणवळण अर्थात लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात चार वर्षांत ३० लाख नोक-या निर्मित होणार आहेत. यामध्ये मुंबई आघाडीवर असेल. रस्ते उभारणीसह रेल्वे मालवाहतूक मार्गासाठी सुरू असलेले विशेष प्रयत्न तसेच या क्षेत्राला मिळालेला पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा यामुळे आगामी काळात यात ‘बूम’ असेल.
