Lokmat Money > बिझनेस न्यूज > एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार

एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार

माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा कंपनी कॉग्निझंट २०२५ मध्ये २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहे. पाहा काय म्हटलंय कंपनीनं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 15:56 IST2025-05-01T15:54:50+5:302025-05-01T15:56:20+5:30

माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा कंपनी कॉग्निझंट २०२५ मध्ये २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहे. पाहा काय म्हटलंय कंपनीनं.

20000 freshers hiring in cognizant 2025 to shape pyramid for AI led delivery | एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार

एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार

माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा कंपनी कॉग्निझंट २०२५ मध्ये २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आखत आहे. मॅनेज्ड सर्व्हिसेस आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय (AI) प्रणित सॉफ्टवेअर विकासाची तयारी करण्यासाठी आपल्या टॅलेंट पिरॅमिडचा विस्तार करणं हे या भरतीचं उद्दीष्ट आहे.

"आम्हाला मोठ्या प्रमाणात मॅनेज्ड सर्व्हिसेसचं काम मिळत आहे. त्यामुळे २०,००० फ्रेशर्स आता आमच्या पिरॅमिडला आकार देतील. या निमित्तानं आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात होईल," असं वक्तव्य कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवीकुमार एस. यांनी मार्च तिमाहीच्या निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत केलं. ऑर्गेनिक ग्रोथ आता परत आली आहे. त्यामुळे पाया रचण्याची ही उत्तम वेळ आहे, असं कुमार म्हणाले.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण

या भरतीची माहिती अशा वेळी समोर आली जेव्हा कॉग्निझंटच्या भारतीय सहकाऱ्यांनी मागणीच्या वातावरणातील अनिश्चिततेचं कारण देत आर्थिक वर्ष २०२६ साठी नेमकी किती भरती होणार याची माहिती देणं टाळलं होतं. असं असलं तरी टॉप पाच आयटी कंपन्या चालू आर्थिक वर्षात ८०,००० ते ८४,००० नोकऱ्यांची भर घालतील, असा अंदाज व्यवस्थापनाने व्यक्त केला जात आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्याप्रमाणं वास्तविक आकडा मोठ्या प्रमाणात बदलूही शकतो.

नवीन भरती झालेल्यांना फ्लोसोर्स (FlowSource) या कॉग्निझंटच्या अंतर्गत डेव्हलपर टूलवर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे टूल जाईल जे मशीन-जनरेटेड कोड आणि मानवी कोडला एकत्र करतं. कॉग्निझंट आपल्या पॉवर प्रोग्रामर आणि फुल-स्टॅक डेव्हलपर भूमिकेसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) मधून विशेष भरती सुरू ठेवणार आहे.

कॉग्निझंटमध्ये चौथ्या तिमाहीच्या अखेरीस १,२०० च्या तुलनेत सुमारे १,४०० प्रारंभिक GenAI एंगेजमेंट्स आहेत. एआयचा विकास तीन वेगवेगळ्या व्हेक्टरमध्ये केला जात आहे. नजीकच्या काळात, व्हेक्टर १ एआय-प्रणित उत्पादकतेवर लक्ष केंद्रित करतं जेणेकरून उद्योजकांना त्यांच्या बॅलन्सशीटवरील अंदाजे २ ट्रिलियन डॉलर्सच्या तांत्रिक कर्जाचं निराकरण करण्याची संधी मिळेल. पहिल्या तिमाहीत, एआयद्वारे करण्यात आलेल्या कोडमध्ये २० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे आणि कंपनीच्या डेव्हलपर्ससाठी महत्त्वाची संधी आहे, असं एआयबाबत बोलताना कुमार म्हणाले.

Web Title: 20000 freshers hiring in cognizant 2025 to shape pyramid for AI led delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.