lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी तिजोरीत आले १९.५८ लाख कोटी रुपये; निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १७.७ टक्के वाढले

सरकारी तिजोरीत आले १९.५८ लाख कोटी रुपये; निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १७.७ टक्के वाढले

मागच्या वर्षी ३.०९ लाख कोटी इतका रिफंड देण्यात आला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 06:08 AM2024-04-22T06:08:57+5:302024-04-22T06:09:27+5:30

मागच्या वर्षी ३.०९ लाख कोटी इतका रिफंड देण्यात आला. 

19.58 lakh crores in government exchequer; Net direct tax collection increased by 17.7 percent | सरकारी तिजोरीत आले १९.५८ लाख कोटी रुपये; निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १७.७ टक्के वाढले

सरकारी तिजोरीत आले १९.५८ लाख कोटी रुपये; निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन १७.७ टक्के वाढले

नवी दिल्ली : प्रत्यक्ष करांमधून सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन वार्षिक आधारावर १७.७ टक्के वाढून १९.५८ लाख कोटींवर पोहोचले. करसंकलनाच्या सुधारित अंदाजापेक्षा मिळालेला कर खूप अधिक आहे, असे कर विभागाने स्पष्ट केले आहे. वाढलेल्या करसंकलनात आयकर आणि कॉर्पोरेट कराचा वाटा सर्वाधिक आहे. 

मागच्या वर्षी निव्वळ प्रत्यक्ष करसंकलनातून १६.६४ लाख कोटी मिळाले. वाढलेल्या करसंकलनातून अर्थव्यवस्थेला मिळालेली गती दिसून येते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात करदात्यांना  ३.७९ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. हे प्रमाण २०२२-२३ या आर्थिक वर्षात दिलेल्या रिफंडपेक्षा २२.७४ टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी ३.०९ लाख कोटी इतका रिफंड देण्यात आला. 

व्यक्तिगत करातून किती पैसे? 
२०२३-२४ या आर्थिक वर्षात सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह (प्रोव्हिजनल) एकूण व्यक्तिगत आयकर करसंकलन १२.०१ लाख कोटी इतके झाले. मागील वर्षीच्या ९.६७ लाख कोटींच्या संकलनापेक्षा हे प्रमाण २४.२६ टक्के अधिक होते. 

Web Title: 19.58 lakh crores in government exchequer; Net direct tax collection increased by 17.7 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Taxकर