Mobile Shope Business: भारतात स्मार्टफोनचे खूप मोठे मार्केट आहे. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत...सर्वजण फोन वापरतात. कुणी ऑनलाईन फोन मागवतो, तर कुणी थेट दुकानात जाऊन फोन खरेदी करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुम्ही १० हजार किंवा ५० हजार रुपयांना खरेदी केलेल्या मोबाईल फोनवर दुकानदाराला किती नफा मिळतो?
वेगवेगळ्या किमतींच्या श्रेणींमध्ये नफा
१०,००० रुपयांचा फोन - दुकानदाराला सुमारे १२००–१३०० रुपये (सॅमसंगवर) आणि ३००–८०० रुपये इतर ब्रँडवर नफा मिळतो.
२०,००० रुपयांचा फोन- १५००–२५०० रुपये नफा.
३०,००० रुपयांचा फोन- २५००–३५०० रुपये नफा.
४०,००० रुपयांचा फोन- ३५००–४५०० रुपये नफा.
५०,००० रुपयांचा फोन - ५०००–६००० रुपये नफा.
iPhone वर किती मार्जिन आहे
₹१ लाख पर्यंतचा फोन (उदा. आयफोन १५ प्रो मॅक्स) - मार्जिन फक्त ४-५% आहे, म्हणजे सुमारे ४०००-५००० रुपये.
कोणत्या कंपनीवर किती नफा?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Samsung मोबाईल फोनमध्ये सर्वाधिक ११-१४% मार्जिन आहे. दुसरीकडे, Vivo / OPPO (चीनी ब्रँड) मध्ये सरासरी मार्जिन ८-१०% पर्यंत आहे, तर OnePlus, Redmi, Motorola मध्ये फक्त ३-४% आणि iPhone (Apple) मध्ये फक्त ४-५% मार्जिन आहे. म्हणूनच दुकानदार नेहमीच सॅमसंग, विवो आणि ओपो सारख्या ब्रँडना प्रथम दाखवण्याचा प्रयत्न करतात.
२०२५ मध्ये सर्वाधिक विक्री होणारे ब्रँड (क्वाटर १) (बाजारपेठेतील वाट्यानुसार)
Vivo – २२%
Samsung – १६%
Xiaomi – १२%
OPPO – १२%
Realme – ११%
ग्राहक काय पाहतात?
महिला - बहुतांश महिला कोणताही फोन खरेदी करण्यापूर्वी कॅमेरा क्वालिटी आणि लूक पाहतात.
पुरुष - पुरुष बॅटरी आणि परफॉर्मन्सकडे लक्ष देतात.
तरुण - आजचे तरुण प्रोसेसर, रॅम आणि इंटरनल मेमरी तपासतात.
सर्वाधिक फोन कधी विकले जातात?
सर्वाधिक फोन दिवाळी, दसरा, ईद सारख्या सणांच्या हंगामात विकले जातात. तर, २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) रोजी विशेष सेल दिवस आयोजित केले जातात. या दिवशीही चांगली विक्री होते.
वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये किंमती वेगवेगळ्या का असतात?
मोठे रिटेल स्टोअर्स (क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजिटल) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अतिरिक्त सवलती देतात. कधीकधी स्थानिक डीलर्स ग्राहकांना त्यांचे मार्जिन कमी करून स्वस्त फोन विकतात. शेवटी, ग्राहक त्याच्याकडेच जातो, जो चांगला डिस्काउंट + ऑफर्स देतो.
मात्र, मोबाईलचा व्यवसाय फक्त फोन विकण्यात नाही, तर त्यावर उपलब्ध असलेल्या मार्जिन, अॅक्सेसरीज आणि ऑफर्समध्ये आहे. दुकानदारासाठी सर्वात फायदेशीर डील म्हणजे सॅमसंग, व्हिवो आणि ओप्पो सारखे ब्रँड, तर आयफोन आणि वनप्लस सारख्या कंपन्यांमध्ये ते कमी कमाई करतात. मोबाईल फोन दुकानदार अॅक्सेसरीज विकूनही चांगली कमाई करतात. त्यातही चांगले मार्जिन असते.