Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > थेट अनुदान योजनेमुळे १0 हजार कोटींची बचत

थेट अनुदान योजनेमुळे १0 हजार कोटींची बचत

थेट अनुदान योजनेमुळे केंद्र सरकारचे पेट्रोलियम उत्पादनांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातील सुमारे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

By admin | Updated: June 9, 2015 23:34 IST2015-06-09T23:34:29+5:302015-06-09T23:34:29+5:30

थेट अनुदान योजनेमुळे केंद्र सरकारचे पेट्रोलियम उत्पादनांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातील सुमारे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत.

10 thousand crores savings through direct donation plan | थेट अनुदान योजनेमुळे १0 हजार कोटींची बचत

थेट अनुदान योजनेमुळे १0 हजार कोटींची बचत

मुंबई : थेट अनुदान योजनेमुळे केंद्र सरकारचे पेट्रोलियम उत्पादनांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानातील सुमारे १० हजार कोटी रुपये वाचणार आहेत. या योजनेमुळे सुमारे ४ कोटी बनावट ग्राहकांची कनेक्शन उघड झाली आहेत. त्याचमुळे अर्थसंकल्पीय तरतुदीच्या एकतृतीयांश एवढे अनुदान वाचविण्यात यश आले आहे.
या योजनेसाठी सुमारे १३ कोटी ग्राहकांची नोंदणी करण्यात आली आहे. या नोंदणीमुळे दोन ठिकाणी नावे नोंदविणाऱ्या ग्राहकांची नावे ओळखण्यात यश आल्याचे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.
सरकारने अनुदान न घेण्याच्या केलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादामुळेही फायदा झाल्याचे इंडियन आॅईल कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्या तेलाच्या किमती घसरत असल्यानेही अनुदानाची रक्कम घटल्याचे सांगण्यात आले. केरोसीनसाठीही थेट अनुदान योजना लागू केल्यास अनुदानाची आणखी मोठी रक्कम वाचविणे शक्य होईल, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.
केरोसीन ग्राहकांची माहिती एकत्रित करण्याविषयी राज्यांना सांगण्यात आले असून, जे ग्राहक या अनुदानासाठी पात्र नाहीत, त्यांचा शोध घेणे यामुळे शक्य होईल, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. मात्र, गरिबांच्या या अनुदानात कपात केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 10 thousand crores savings through direct donation plan