Lokmat Money > बिझनेस न्यूज > Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा!

Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा!

Insurance: दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अपघात झाल्यास रेल्वेकडून प्रवास विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते हे माहित नसते. मृत्यू झाल्यास भरपाई दिली जातेच जखमी झाल्यासही ही मदत दिली जात असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:11 AM2024-06-11T06:11:05+5:302024-06-11T06:11:38+5:30

Insurance: दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अपघात झाल्यास रेल्वेकडून प्रवास विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते हे माहित नसते. मृत्यू झाल्यास भरपाई दिली जातेच जखमी झाल्यासही ही मदत दिली जात असते.

10 lakh insurance is available in just 45 paise! | Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा!

Insurance: फक्त 45 पैशांत मिळतो 10 लाखांचा विमा!

नवी दिल्ली : दैनंदिन कामासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यामुळेच रेल्वेला जीवनवाहिनी म्हटले जाते. 
परंतु दररोज होणाऱ्या अपघातात अनेक जण जखमी होतात. गंभीर अपघातात काही जणांचे बळीही जातात. परंतु न चुकता दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही अपघात झाल्यास रेल्वेकडून प्रवास विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते हे माहित नसते. मृत्यू झाल्यास भरपाई दिली जातेच जखमी झाल्यासही ही मदत दिली जात असते. 

काय आहे रेल्वे प्रवासी विमा?
प्रवासी विम्याची सुविधा केवळ रेल्वे तिकिट काढणाऱ्या प्रवाशांनाचा दिली जाते. जेव्हा व्यक्ती तिकीट काढते तेव्हाच त्याला प्रवासी विम्याची सुविधा दिली जाते. 
तिकिटातून ४५ पैशांचा विम्याचा प्रिमियम भरावा लागतो. यात १० लाखांपर्यंत सुरक्षा दिली जाते. रेल्वेकडून ही सुविधा दिला जात असल्याचे अनेक प्रवाशांना ठाऊक नाही.

१० लाखांपर्यंत मदत पूर्णपणे अपंगत्व आले किंवा मृत्यू झाल्यास प्रवासी विमाधाकरकाच्या कुटुंबीयांना दिली जाते. 
७.५ लाखांपर्यंत मदत आंशिक स्वरुपातील पण कायमचे अपंगत्व आल्यास दिली जाते. 
२ लाखांची रक्कम अपघातात जखमी झाल्यास उपचार खर्चासाठी दिली 
जात असते. 

काय आहेत अटी? 
- रेल्वे तिकिटाचे बुकिंग ऑनलाईन पद्धतीने करावी लागते.
- खिडकीवर तिकीट काढल्यास ही सुविधा दिली जातत नाही. 
- जनरल डब्यात प्रवास करणाऱ्यांनाही ही सुविधा नाही. 
- रेल्वे प्रवासी विमा काढणे हे प्रवाशांसाठी ऐच्छिक असते. 
- अपघातग्रस्त व्यक्तीला भरपाई विमा कंपनीकडून दिली जाते. 

विमा कसा काढाल? 
- यासाठी तिकिट बुक करताना ‘रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स अप्लाय’ हा पर्याय निवडा. त्यात नॉमिनीचा तपशिल, मोबाइल तसेच इमेल आयडी आदी माहिती भरावी. हा तपशिल नसल्यास भरपाई मिळण्यात अडचणी येतात. 
- तिकिटासाठी कोणतीही श्रेणी निवडली असली तरी  प्रीमियमपोटी केवळ ४५ पैसे इतके शुक्ल घेतले जाते. 

Web Title: 10 lakh insurance is available in just 45 paise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.