Aadhaar Card News: आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) मृत व्यक्तींचे आधार कार्ड ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. UIDAI ने आतापर्यंत १.१७ कोटींहून अधिक १२-अंकी आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत. बुधवारी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. या उपक्रमांतर्गत २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत मृत्यूंसाठी UIDAI ने माय आधार पोर्टलवर कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला असल्यास त्याची सूचना देण्यासाठी सेवा सुरू केली आहे.
मृत्यूच्या पडताळणीनंतर आधार कार्ड ब्लॉक
"आधार डेटाबेसची सतत अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, UIDAI ने विविध स्त्रोतांकडून मृत्यूच्या नोंदी मिळविण्यासाठी आणि योग्य पडताळणीनंतर संबंधित आधार क्रमांक निष्क्रिय करण्यासाठी पावले उचलली आहेत," असं निवेदनात म्हटलं आहे. UIDAI नं भारताच्या रजिस्ट्रार जनरलना आधार क्रमांकाशी जोडलेले मृत्यू रेकॉर्ड शेअर करण्याची विनंती केली होती आणि नागरी नोंदणी प्रणाली (CRS) वापरून २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे १.५५ कोटी मृत्यू रेकॉर्ड मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
१.१७ कोटी आधार निष्क्रिय
"योग्य पडताळणीनंतर, सुमारे १.१७ कोटी आधार क्रमांक निष्क्रिय करण्यात आले आहेत. अशाच प्रकारची प्रक्रिया बिगर-नागरिक नोंदणी प्रणाली असलेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. आतापर्यंत, सुमारे ६.७ लाख मृत्यू नोंदी प्राप्त झाल्या आहेत आणि त्या निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू आहे," असंही त्यांनी नमूद केलंय. UIDAI नं म्हटल्यानुसार, कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर, मृत व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं, स्वतः प्रमाणित केल्यानंतर, मृत व्यक्तीचा आधार क्रमांक आणि मृत्यू नोंदणी क्रमांक तसेच इतर तपशील पोर्टलवर देणं आवश्यक आहे.
मृत व्यक्तींच्या आधार क्रमांक धारकांची ओळख पटविण्यासाठी UIDAI राज्य सरकारांचीही मदत घेत आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून, आधार क्रमांक धारक हयात आहे की नाही हे पडताळण्यासाठी १०० वर्षांवरील लोकांची माहिती राज्य सरकारांसोबत शेअर केली जात आहे.