Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >म्युच्युअल फंड > SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

Mutual Fund SIP Vs SWP: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 'SIP' आणि 'SWP' हे दोन शब्द अत्यंत लोकप्रिय आहेत. पाहूया या दोघांमध्ये काय आहे फरक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:09 IST2026-03-10T13:08:50+5:302026-03-10T13:09:31+5:30

Mutual Fund SIP Vs SWP: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 'SIP' आणि 'SWP' हे दोन शब्द अत्यंत लोकप्रिय आहेत. पाहूया या दोघांमध्ये काय आहे फरक?

You may know about SIP, but how much do you know about SWP? Know the difference between the two before investing | SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

SIP माहीत असेलच पण SWP बाबत किती माहिती आहे? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या दोघातील फरक

Mutual Fund SIP Vs SWP: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी 'SIP' (Systematic Investment Plan) आणि 'SWP' (Systematic Withdrawal Plan) हे दोन शब्द अत्यंत लोकप्रिय आहेत. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही नियमित अंतरानं छोटी रक्कम गुंतवता, तर एसडब्ल्यूपीद्वारे तुम्ही तुमच्या गुंतवलेल्या फंडातून ठराविक वेळी पैसे काढू शकता. एसआयपीचे मुख्य ध्येय दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण करणं हे आहे, तर निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी एसडब्ल्यूपी हा एक चांगला पर्याय आहे. उत्तम आर्थिक नियोजनासाठी या दोन्हीतील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

एसआयपी (SIP) म्हणजे काय?

सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडमध्येगुंतवणूक करण्याचा सर्वात सोपा आणि शिस्तबद्ध मार्ग आहे. यामध्ये एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दरमहा, तिमाही किंवा दर आठवड्याला एक निश्चित रक्कम गुंतवली जाते. ज्या गुंतवणूकदारांना जास्त ताण न घेता हळूहळू संपत्ती निर्माण करायची आहे, त्यांच्यासाठी हे विशेष फायदेशीर आहे. अनेक फंडांमध्ये महिन्याला केवळ १०० किंवा ५०० रुपयांपासून एसआयपी सुरू करता येते, ज्यामुळे नवे गुंतवणूकदारही सहज सामील होऊ शकतात. गरज पडल्यास एसआयपी थांबवणं, वाढवणं किंवा बंद करणंही शक्य आहे.

एसआयपीचे प्रमुख फायदे

गुंतवणुकीमुळे नियमित बचत आणि शिस्तीची सवय लागते.
अल्प रकमेतूनही गुंतवणुकीला सुरुवात करता येते.
'रुपी कॉस्ट एव्हरेजिंग'मुळे बाजारातील चढ-उतारांची जोखीम कमी होते (जेव्हा NAV कमी असतो, तेव्हा जास्त युनिट्स मिळतात).
दीर्घकाळात चक्रवाढ व्याजाचा मोठा फायदा मिळतो.
मुलांचे शिक्षण, घर खरेदी किंवा निवृत्ती यांसारख्या उद्दिष्टांसाठी हा पर्याय योग्य आहे.

एसडब्ल्यूपी (SWP) म्हणजे काय?

सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन ही म्युच्युअल फंडची एक विशेष सुविधा आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार आपल्या फंडातून दरमहा, तिमाही किंवा वर्षाला एक निश्चित रक्कम काढून घेऊ शकतात. यामध्ये सर्व पैसे एकाच वेळी काढण्याऐवजी गरजेनुसार काढले जातात, ज्यामुळे उर्वरित गुंतवणूक फंडातच राहते आणि वाढत राहते. एसडब्ल्यूपी प्रामुख्यानं निवृत्तीचं नियोजन, मासिक खर्च किंवा फ्रीलांसर सारख्या अनियमित उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खूप उपयुक्त आहे.

एसडब्ल्यूपीचे प्रमुख फायदे

म्युच्युअल फंडातून नियमित आणि स्थिर उत्पन्न मिळतं.
निवृत्तीनंतरच्या किंवा इतर मासिक गरजांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
पैसे काढल्यानंतर उर्वरित रक्कम गुंतवलेलीच राहते आणि चक्रवाढ पद्धतीनं वाढत राहतं.
एकरकमी पैसे काढण्याच्या तुलनेत येथे कर चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केला जाऊ शकतो (केवळ काढलेल्या रकमेवरच कॅपिटल गेन टॅक्स लागतो).
पैसे काढण्याची रक्कम, वेळ आणि कालावधी यामध्ये पूर्ण लवचिकता असते.
शिस्तबद्ध पद्धतीने पैसे काढण्यास मदत होते, ज्यामुळे तुमचा फंड लवकर संपत नाही.

(टीप - यामध्ये केवळ सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : SIP बनाम SWP: निवेश से पहले अंतर समझें, लाभ उठाएं।

Web Summary : SIP नियमित निवेश से संपत्ति बनाता है, जबकि SWP मौजूदा फंड से आय प्रदान करता है, जो सेवानिवृत्ति के लिए आदर्श है। दोनों को समझना बेहतर वित्तीय योजना सुनिश्चित करता है।

Web Title : SIP vs SWP: Understand the difference before investing wisely.

Web Summary : SIP builds wealth through regular investments, while SWP provides income from existing funds, ideal for retirement. Understanding both ensures better financial planning and disciplined withdrawals.