lokmat Supervote 2024
Lokmat Money >म्युच्युअल फंड > महिन्याला ₹१०००० च्या SIP नं ३ वर्षांत कराल फॉरेन ट्रिप! पाहा कसा आणि किती तयार होईल फंड

महिन्याला ₹१०००० च्या SIP नं ३ वर्षांत कराल फॉरेन ट्रिप! पाहा कसा आणि किती तयार होईल फंड

म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी जमवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:05 AM2024-01-29T11:05:15+5:302024-01-29T11:06:37+5:30

म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी जमवू शकता.

With a SIP of rs 10000 per month you will do a foreign trip in 3 years See how and how much the fund will be created know calculation investment | महिन्याला ₹१०००० च्या SIP नं ३ वर्षांत कराल फॉरेन ट्रिप! पाहा कसा आणि किती तयार होईल फंड

महिन्याला ₹१०००० च्या SIP नं ३ वर्षांत कराल फॉरेन ट्रिप! पाहा कसा आणि किती तयार होईल फंड

Power of SIP: म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करणं अतिशय सोपं आहे. यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून तुम्ही दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी जमवू शकता. गुंतवणूकदाराला एसआयपीद्वारे नियमित गुंतवणूक करण्याची सवय असते. यामध्ये एक फायदा असा आहे की गुंतवणूकदार एसआयपी कॅल्क्युलेटरच्या मदतीनं अंदाजे किती परतावा मिळेल याची माहिती मिळवू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही येत्या २-३ वर्षात परदेशी सहलीची योजना आखत असाल, तर SIP तुम्हाला त्यासाठी चांगला निधी तयार करण्यास मदत करू शकते. १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपी आणि ३ वर्षांच्या गुंतवणुकीच्या कालावधीवर किती रक्कम जमा होऊ शकते हे पाहू.

३ वर्षात किती फंड जमेल?

एसआयपी कॅल्क्युलेटर (SIP Calculator) नुसार, जर तुम्ही दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी करत असाल आणि सरासरी वार्षिक परतावा मिळवला, तर ३ वर्षात तुम्हाला ४,३५,०७६ चा फंड जमेल. दीर्घ मुदतीसाठी इक्विटी फंडांचा सरासरी एसआयपी परतावा वर्षाला १२ टक्के असू शकतो. या कॉर्पसमध्ये तुमची गुंतवणूक ३.६० लाख रुपये असेल, तर तुमचा अंदाजे फायदा ७५,०७६ रुपये असेल. अशा प्रकारे, एसआयपीद्वारे तुम्ही अंदाजे ४.५ लाख रुपयांचा निधी तयार करू शकता.

बीपीएन फिनकॅपचे संचालक ए के निगम म्हणतात की म्युच्युअल फंड एसआयपी तुम्हाला तुमच्या भविष्याचे अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात मदत करू शकते. तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार तुम्ही गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी निवडू शकता. उदाहरणार्थ, पुढील ३-५ वर्षांत जर एखाद्यानं कार खरेदी करणं, परदेशवारीचं उद्दिष्ट ठेवलं, तर तो एसआयपीच्या मदतीने प्रोजेक्टेड फंड तयार करू शकतो. दरम्यान, म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूकदारांनी हे जाणून घेतलं पाहिजे की ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. त्यामुळे त्यांचा परतावा बाजाराच्या हालचालींवर अवलंबून असतो आणि यात चढ-उतार होऊ शकतो. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारानं आपलं उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

परदेशवारीचा अंदाजे खर्च

जर तुम्हाला युरोप दौऱ्यावर जायचे असेल, तर ३ वर्षांसाठी तयार केलेला १० हजार रुपयांचा मासिक एसआयपी निधी उपयुक्त ठरू शकतो. ट्रॅव्हल बुकिंग एग्रीगेटर MakeMyTrip च्या वेबसाइटवर, एका व्यक्तीसाठी १६ रात्री आणि १७ दिवसांसाठी युरोप ट्रिप पॅकेजची किंमत सुमारे ३.३० लाख रुपये आहे. तर, पॅकेजचे अनेक प्रकार आहेत. अशाप्रकारे, १० हजार रुपयांची एसआयपी ही फायनान्शिअल टार्गेट साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

(टीप - यामध्ये म्युच्युअल फंड एसआयपीमधील अंदाजित फंडाची माहिती देण्यात आली आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: With a SIP of rs 10000 per month you will do a foreign trip in 3 years See how and how much the fund will be created know calculation investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.