मुकेश अंबानी यांच्या जिओब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. तीन दिवस (३० जून ते २ जुलै २०२५) चाललेल्या या ऑफरमध्ये एकूण १७,८०० कोटी रुपयांची (म्हणजे २.१ अब्ज डॉलर्स) गुंतवणूक करण्यात आली. जिओब्लॅकरॉक नाइट फंड, जिओब्लॅकरॉक लिक्विड फंड आणि जिओ ब्लॅकरॉक मनी मार्केट फंड या त्यांच्या तीन नव्या कॅश/डेट फंडांमध्ये ही गुंतवणूक झाली आहे.
या एनएफओची निवड ९० हून अधिक मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केली होती. त्याच वेळी, सामान्य गुंतवणूकदारांनीही मोठ्या संख्येनं यात भाग घेतला. ऑफर कालावधीत ६७,००० हून अधिक गुंतवणूकदारांनी या फंडामध्ये गुंतवणूक केली. संस्थांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद जबरदस्त होता, अशी माहिती कंपनीनं दिली.
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
इतिहास घडवला
२ जुलै २०२५ रोजी बंद झालेला हा एनएफओ भारतातील कॅश/डेट फंड विभागातील सर्वात मोठ्या ऑफरपैकी एक बनला आहे. यामुळे, JioBlackRock असेट मॅनेजमेंट देशातील टॉप १५ असेट मॅनेजमेंट कंपन्यांमध्ये जागा मिळवली आहे. JioBlackRock चे हे पहिले फंड गुंतवणूकदारांना त्यांच्या रोख आणि अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यास मदत करतील. हे फंड वेगवेगळ्या लिक्विडीटी (पैशांच्या गरजा), जोखीम आणि परतावा उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पर्याय देतात.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)