Lokmat Money >म्युच्युअल फंड > Mutual Fund असावा तर असा! ₹१०००० च्या गुंतवणूकीवर मिळाला ₹१६ कोटींचा रिटर्न

Mutual Fund असावा तर असा! ₹१०००० च्या गुंतवणूकीवर मिळाला ₹१६ कोटींचा रिटर्न

आजच्या काळात गुंतवणूकासाठी म्युच्युअल फंड हे आवडीचं साधन झालं आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घ मुदतीचा विचार करून गुंतवणूक करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:00 AM2024-01-13T10:00:25+5:302024-01-13T10:01:29+5:30

आजच्या काळात गुंतवणूकासाठी म्युच्युअल फंड हे आवडीचं साधन झालं आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घ मुदतीचा विचार करून गुंतवणूक करतात.

hdfc flexi cap mutual fund investment of rs 10000 got a return of rs 16 crore investment tips | Mutual Fund असावा तर असा! ₹१०००० च्या गुंतवणूकीवर मिळाला ₹१६ कोटींचा रिटर्न

Mutual Fund असावा तर असा! ₹१०००० च्या गुंतवणूकीवर मिळाला ₹१६ कोटींचा रिटर्न

Mutual Fund: आजच्या काळात गुंतवणूकासाठी म्युच्युअल फंड हे आवडीचं साधन झालं आहे. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक दीर्घ मुदतीचा विचार करून गुंतवणूक करतात. आज आम्ही अशाच एका म्युच्युअल फंडाबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. या फंडानं 150 टक्के परतावा दिलाय.

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, एचडीएफसी फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड सध्या भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंडांपैकी एक आहे. गेल्या 29 वर्षांमध्ये, या फंडाने पोझिशनल गुंतवणूकदारांच्या पैशात 150 पट वाढ केली आहे. या कालावधीत कंपनीने 18.87 टक्के CGRA दिलाय.

10000 रुपयांचे झाले 16 कोटी

जर एखाद्या व्यक्तीने 1 जानेवारी 1995 रोजी 10,000 रुपयांचा एसआयपी केली असेल, तर त्यांची गुंतवणूक 31 डिसेंबर 2023 पर्यंत 34.80 लाख रुपये झाली असती. त्यावर मिळालेला परतावा जोडला तर तो आता 16.5 कोटी रुपये झाला आहे. या म्युच्युअल फंडाबद्दल सांगायचं झालं तर कंपनी लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते.

(टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: hdfc flexi cap mutual fund investment of rs 10000 got a return of rs 16 crore investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.