Lokmat Money > बिझनेस न्यूज > फक्त सात आकडे दूर; मुकेश अंबानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत 

फक्त सात आकडे दूर; मुकेश अंबानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत 

‘हुरून ग्लाेबल रीच’ची यादी, ‘सीरम’चे पूनावाला ११३ व्या स्थानी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 04:54 AM2021-03-03T04:54:12+5:302021-03-03T04:55:01+5:30

‘हुरून ग्लाेबल रीच’ची यादी, ‘सीरम’चे पूनावाला ११३ व्या स्थानी 

Mukesh Ambani is the eighth richest man in the world | फक्त सात आकडे दूर; मुकेश अंबानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत 

फक्त सात आकडे दूर; मुकेश अंबानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत 

लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी यावर्षीच्या हुरून ग्लाेबलच्या श्रीमंतांच्या यादीत पहिल्या १० मध्ये स्थान  मिळविले आहे. त्यांची एकूण ८३ अब्ज डाॅलर्स म्हणजे सुमारे ६ लाख ९ हजार काेटी रुपयांची संपत्ती आहे. या यादीत ते आठव्या स्थानी आहेत. 


हुरून ग्लाेबलच्या यादीनुसार अंबानी यांची संपत्ती गेल्या वर्षभरात २४ टक्क्यांनी वाढली आहे. अंबानी यांच्यासह अदानी समूहाचे अध्यक्ष गाैतम अदानी यांचे नाव ४८ व्या स्थानी आहे. अदानी यांच्याकडे २.३४ लाख काेटी रुपयांची संपत्ती आहे. तर १.९४ लाख काेटींची संपत्ती असलेले शिव नाडर या यादीत ५८ व्या स्थानी आहेत. लक्ष्मी मित्तल ते १०४ व्या स्थानी आहेत. तर ‘सीरम’चे सायरस पूनावाला हे ११३व्या स्थानी आहेत. 

भारतात २०९ अब्जाधीश
nहुरूनच्या यादीनुसार भारतात एकूण २०९ अब्जाधीश आहेत. त्यापैकी १७७ जण भारतात राहतात. अमेरिकेत एकूण ६८९ अब्जाधीश आहेत. 
nगेल्या वर्षी भारतातील ५० अब्जाधीशांची नावे या यादीत समाविष्ट झाली आहेत. गेल्या वर्षात भारतीयांपैकी जय चाैधरी यांची संपत्ती सर्वात वेगाने २७१ टक्क्यांनी वाढली. त्यांच्यापाठाेपाठ विनाेद अदानी यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी वाढली. 

एलाॅन मस्क सर्वात श्रीमंत
‘टेस्ला’चे एलाॅन मस्क हे या यादीनुसार जगातल सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याकडे १९७ अब्ज डाॅलर्स एवढी संपत्ती आहे. गेल्या वर्षभरात त्यांची संपत्ती ३२८ टक्क्यांनी जवळपास १५१ अब्ज डाॅलर्स एवढी वाढली. ‘ॲमेझाॅन’चे जेफ बेझाेस आणि ‘पिंडूओडूओ’चे काेलीन हुआंग यांची संपत्ती प्रत्येकी ५० अब्ज डाॅलर्सने वाढली. या यादीतील १६१ जणांची संपत्ती ५ अब्ज डाॅलर्सहून अधिक वाढली. चीनचे ८४, अमेरिकेचे ३८ आणि ५ भारतीय आहेत.

Web Title: Mukesh Ambani is the eighth richest man in the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.