Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या

मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या

Credit Card for Business: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्याच्या उद्देशाने अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:59 IST2025-05-05T15:57:54+5:302025-05-05T15:59:09+5:30

Credit Card for Business: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्याच्या उद्देशाने अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड.

Modi government is giving credit card with limit of rs 5 lakh Know how to get the benefit | मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या

मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या

Credit Card for Business: केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देण्याच्या उद्देशाने अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक म्हणजे सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड. चला तर मग जाणून घेऊया या क्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करावा लागेल.

किती आहे लिमिट?

एंटरप्राइझ पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी विशेष कस्टमाईज्ड क्रेडिट कार्ड आहे. त्याची मर्यादा ५ लाख रुपये आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेनुसार पहिल्या वर्षी १० लाख कार्ड देण्यात येणार आहेत.

Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?

नोंदणीची पद्धत काय?

सर्वप्रथम एंटरप्राइज पोर्टल- msme.gov.in. भेट द्या.

येथे आपल्याला क्विक लिंक्स या विभागावर क्लिक करावं लागेल.

यानंतर तुम्हाला Udyam Registration वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावं लागेल.

येथे तुम्हाला नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रं आणि पात्रतेची सविस्तर माहिती मिळेल.

त्यानुसार नोंदणी करता येईल. नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्डची सुविधा आहे.

याचीही घोषणा करण्यात आली

गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटींवरून १० कोटी रुपये करण्यात आलं होतं. त्याचबरोबर २७ प्राधान्य क्षेत्रातील कर्जासाठी १ टक्के कमी शुल्कासह स्टार्टअप्सची गॅरंटी कव्हर दुप्पट करून २० कोटी रुपये करण्यात येणार आहे.

Web Title: Modi government is giving credit card with limit of rs 5 lakh Know how to get the benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.