Looking for free LPG gas cylinder? Only 1 week left! Know how to get it under Pradhan Mantri Ujjwala Yojana | गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची शेवटची संधी; केवळ 7 दिवस शिल्लक 

गॅस सिलिंडर मोफत मिळवण्याची शेवटची संधी; केवळ 7 दिवस शिल्लक 

पंतप्रधान उज्ज्वला योजने(Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY)मार्फत कोणालाही गॅस सिलिंडर मोफत मिळू शकतो. योजनेचा लाभ घेण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. कोरोनामुळे या योजनेची तारीख एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर कनेक्शन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेचा फायदा घेण्यासाठी केवळ 7 दिवस शिल्लक आहेत.

सोपी प्रक्रिया
प्रधानमंत्री उज्ज्वला योजने(Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY)त तुम्हाला नोंदणी करावीशी वाटतेय? तसंही कोणत्याही सरकारी योजनेत नोंदणी करणे अगदी सहज-सोपे आहे. उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी करणे खूप सुलभ झाले आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनें(Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY)तर्गत बीपीएल कुटुंबातील एक महिला गॅस कनेक्शन मिळविण्यासाठी अर्ज करू शकते. आपण या योजनेशी संबंधित अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com वर जाऊन आपली नोंदणी करू शकता.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा कसा फायदा मिळवाल?
सर्वप्रथम अर्जदारानं प्रधानमंत्री उज्ज्वला योजने(Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY)च्या अधिकृत वेबसाइटवर जावे.
वेबसाइटवर मुख्यपृष्ठ उघडेल, आपल्याला डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर आपल्याला पंतप्रधान उज्ज्वला योजना फॉर्मवर क्लिक करावे लागेल.
एक फॉर्म आपल्या समोर उघडेल, आपण आपला फॉर्म डाऊनलोड करा.
फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर आपण फॉर्ममधील सर्व माहिती भरा. उदाहरणार्थ, अर्जदाराचे सर्व नाव, तारीख, ठिकाण भरल्यानंतर आपल्या जवळच्या एलपीजी केंद्रावर सादर करा.
सर्व कागदपत्रे देखील द्या. कागदपत्र पडताळणीनंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बीपीएल कार्ड
आधार कार्ड
मोबाइल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
वय प्रमाणपत्र
बीपीएल यादीतील नाव मुद्रण
बँक फोटो कॉपी
रेशनकार्डची छायाचित्र प्रत

उज्ज्वला योजनेच्या अटी
अर्जदार एक महिला असणे आवश्यक आहे.
महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
महिला बीपीएल कुटुंबातील असाव्यात.
महिला अर्जदाराकडे बीपीएल कार्ड आणि बीपीएल रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे नाव किंवा कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याचे नाव आधीपासूनच एलपीजी कनेक्शनमध्ये असू नये

याचा फायदा कोणाला मिळतो
पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत बीपीएल कुटुंबांना घरगुती एलपीजी गॅस कनेक्शन प्रदान करते. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय ही योजना चालवित आहे. 2011च्या जनगणनेतील बीपीएल कुटुंबांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळत आहे. अशा सुमारे 8 कोटी कुटुंबांना याचा फायदा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे 2016 रोजी पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरू केली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Looking for free LPG gas cylinder? Only 1 week left! Know how to get it under Pradhan Mantri Ujjwala Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.