Lockdown: Partial lockdown workers, impact on delivery of goods | Lockdown : अंशत: लॉकडाऊनचा कामगार, वस्तूंच्या वितरणावर परिणाम

Lockdown : अंशत: लॉकडाऊनचा कामगार, वस्तूंच्या वितरणावर परिणाम

नवी दिल्ली : अंशत: लॉकडाऊनचा कामगारांचे स्थलांतर आणि वस्तूंच्या वितरणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असा इशारा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने (सीआयआय) केलेल्या सीईओंच्या एका सर्वेक्षणात देण्यात आला आहे. 
कामगार व वस्तूंच्या हालचालींवर मर्यादा  आल्यास औद्योगिक उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे. 
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुतांश सीईओंनी सूचित केले की, अंशत: लॉकडाऊन उपायांचा कामगारांच्या स्थलांतरावर आणि मालाची वाहतूक यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या अर्ध्यापेक्षा जास्त सीईओंनी सांगितले की, अंशत: लॉकडाऊनच्या काळात कामगारांच्या हालचालींवर मर्यादा आल्यास आपल्या उत्पादनावर परिणाम होईल. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lockdown: Partial lockdown workers, impact on delivery of goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.