Johnson & Johnson's Baby Soap, Powder Most Popular | जॉन्सन अँड जॉन्सनचे बेबी सोप, पावडर सर्वात लोकप्रिय
जॉन्सन अँड जॉन्सनचे बेबी सोप, पावडर सर्वात लोकप्रिय

मुंबई : नवजात शिशू आणि बालकांच्या संगोपनामध्ये मातांचा सर्वाधिक सहभाग असून, त्यांना त्यांचे आई-वडील हे बऱ्याच प्रमाणात मदत करीत असतात. बालकांच्या पोषणासाठी मातेच्या दुधालाच सर्वाधिक पसंती मिळत असते. त्या खालोखाल घरामध्ये शिजविलेल्या अन्नपदार्थांचा वापर केला जातो. जॉन्सनची बेबी पावडर आणि साबण, तसेच डाबर लाल तेल यांचा वापर सर्वाधिक होतो.
‘लोकमत’च्या इनसाइट टीमने राज्यातील श्रेणी २च्या विविध शहरांमध्ये सर्वेक्षण करून बालसंगोपन, त्याची प्राथमिक जबाबदारी, बाळांसाठी वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती संकलित केली. त्यामधून बालसंगोपनामध्ये आजही माताच आघाडीवर असल्याचे उघड झाले आहे.
याशिवाय मातांचे आई-वडील हे त्यांना सर्वाधिक मदत करीत असतात. मात्र, पती किंवा सासू-सासरे यांच्यावर महिला कमी अवलंबून राहतात,
असेही दिसून आले आहे.
बहुसंख्य महिला या बाळंतपणासाठी माहेरी असतात. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतरच्या काळात बालसंगोपनामध्ये त्यांचे
आई-वडील हे त्यांना मदत
करताना दिसतात. पाळणाघरे
अथवा घरगुती कामवाल्यांबाबत
मात्र फारसा विश्वास दिसून येत
नाही.
सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ५९ टक्के महिलांना एकच मूल होते, तर ३६ टक्के महिला या दोन मुलांच्या माता होत्या. अवघ्या पाच टक्के महिलांना दोनपेक्षा अधिक मुले होती. बाळांच्या आहारामध्ये अंगावरील दुधाचा वापर सर्वाधिक माता करीत असतात. त्यामानाने पाकीटबंद बेबीफूडचा वापर खूपच कमी प्रमाणामध्ये होत असल्याचे दिसून आले आहे.
बाळांसाठी वापरल्या जाणाºया साबणांमध्ये जॉन्सन अँड जॉन्सनचा बेबी सोप हा सर्वाधिक ३८ टक्के मातांकडून वापरला जातो, तर ३० टक्के मातांची पसंती हिमालया
साबणाला आहे. बेबी डव्हचा
वापर २७ टक्के, तर अन्य साबणांचा वापर १५ टक्के माता करतात. चार टक्के माता आपल्या बाळासाठी कोणताही साबण वापरत नाहीत, असेही सर्वेक्षणातून उघड झाले आहे. पावडरमध्येही जॉन्सन अँड जॉन्सन (४६टक्के) प्रथम क्रमांक राखून आहे. त्यापाठोपाठ हिमालया (२३टक्के) आहे.
तेलांमध्ये डाबर लाल तेल पहिल्या स्थानी
आहे. मात्र, अन्य अनेक ब्रँडही
वापरले जात असल्याचे दिसून आले आहे.
>वापरले जाणारे तेल
तेल (%)
डाबर लाल तेल १८
पॅराशूट आॅइल १७
जॉन्सन अँड जॉन्सन १३
हिमालया आॅइल १०
बदाम/आॅलिव्हसारखी
विशेष तेले ०९
इतर ३३
>डॉक्टरांची भेट
वारंवारता टक्के
सप्ताहात एकाहून जास्त वेळा ०३
सप्ताहात एकदा ०३
पंधरवड्यात एकदा १९
महिन्यात एकदा ३०
दोन महिन्यांतून एकदा १२
बाळाच्या प्रकृतीनुसार ३२

Web Title: Johnson & Johnson's Baby Soap, Powder Most Popular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.