Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेटच्या ऑडिटमध्ये पैशाची अफरातफर झाल्याचे उघड

जेटच्या ऑडिटमध्ये पैशाची अफरातफर झाल्याचे उघड

कंपनी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ऑडिटमध्ये जेट एअरवेजमधील कोट्यवधी रुपयांची अफरातफर व विमान इंधनाच्या खोट्या बिलांचा घोटाळा समोर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:27 AM2019-07-16T04:27:27+5:302019-07-16T04:27:36+5:30

कंपनी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ऑडिटमध्ये जेट एअरवेजमधील कोट्यवधी रुपयांची अफरातफर व विमान इंधनाच्या खोट्या बिलांचा घोटाळा समोर आला आहे.

It was a fraud of money in the audit of Jet | जेटच्या ऑडिटमध्ये पैशाची अफरातफर झाल्याचे उघड

जेटच्या ऑडिटमध्ये पैशाची अफरातफर झाल्याचे उघड

मुंबई : कंपनी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या ऑडिटमध्ये जेट एअरवेजमधील कोट्यवधी रुपयांची अफरातफर व विमान इंधनाच्या खोट्या बिलांचा घोटाळा समोर आला आहे. हे आॅडिट गंभीर आर्थिक गुन्हे कार्यालयामार्फत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या तक्रारीवर करण्यात आले होते, अशी माहिती जेट एअरवेजमधील सूत्रांनी दिली.
या आॅडिटमध्ये जेट एअरवेजने आपली सहयोगी कंपनी जेट लाइटला २०१५ ते १८ या चार वर्षांत तब्बल ३,३५३ कोटी कर्ज दिल्याचे समोर आले आहे. जेट एअरवेज स्वत: तोट्यात चालत असताना जेट लाइटवर ही मेहेरबानी करण्यात आली.
कंपनीला दिलेल्या कर्जाची तरतूदही जेट एअरवेजने हिशेबात केली, पण त्यासाठी काय तारण घेतले, संचालक मंडळाने कर्ज देण्याबाबत ठराव पारित केला काय, ही माहिती जेटने आॅडिटरांना उपलब्ध केली नाही.
याचबरोबर जेट एअरवेजने विमान इंधनाची फुगवलेली बिले तयार करून रकमेची अफरातफर केल्याचे समोर आले. याशिवाय जेट प्रिव्हिलेज माईल्स या ग्राहकांच्या सवलतीच्या योजनेत १४० कोटींचे खोटे जेपी माइल्स ग्राहकांना दाखवून ४६ कोटी काढून घेतल्याचेही समोर आले.
जेट एअरवेजकडे विविध बँकाचे ८,००० कोटी कर्ज थकीत आहे, शिवाय व्यवसायिक देणी मिळून एकूण २५,००० कोटी कंपनीला द्यायचे आहेत. जेट एअरवेजने आपला व्यवसाय दोन महिन्यांपूर्वी बंद केला आहे. कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलने आशिष छावधरिया यांची रेझोल्युशन प्रोफेशनल म्हणून जेटवर नेमणूक केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
>ग्राहकांचा शोध सुरू
गेल्या महिन्यात त्या दोघांनाही
मुंबई विमानतळावरून विदेशात जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता जेट एअरवेजची मालमत्ता विकून कर्जफेड करण्याचा एकमेव पर्याय जेटच्या धनकोंपुढे आहे. त्यामुळे स्टेट बँकेसहित सर्व धनकोंनी आता जेटसाठी ग्राहकाचा शोध सुरू केला आहे.

Web Title: It was a fraud of money in the audit of Jet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.