Lokmat Money > बिझनेस न्यूज > ३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स

३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स

PPF, SSY Schemes Interest Rates: देशातील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवतात आणि ठराविक व्याजदरानं परतावा मिळवतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:03 IST2025-06-28T13:00:58+5:302025-06-28T13:03:27+5:30

PPF, SSY Schemes Interest Rates: देशातील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवतात आणि ठराविक व्याजदरानं परतावा मिळवतात.

interest rates of schemes like PPF SSY might be reduced on June 30 2025 Government likely to take a big decision see details | ३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स

३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स

PPF, SSY Schemes Interest Rates: देशातील नागरिकांसाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या बचत योजना राबविल्या जात आहेत, ज्यामध्ये लोक आपले पैसे गुंतवतात आणि ठराविक व्याजदरानं परतावा मिळवतात. या बचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), सुकन्या समृद्धी योजना (SSY) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) सारख्या अनेक बचत योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये गुंतवलेले पैसे गमावण्याची भीती नाही. जर तुम्हीही तुमचे पैसे गुंतवण्यासाठी या बचत योजनांचा आधार घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. वास्तविक, सरकार आता या बचत योजनांच्या व्याजदरात कपात करू शकते. चला जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

व्याजदर कमी होऊ शकतात

सुकन्या समृद्धी योजना (SSY), पीपीएफ आणि एनएससी सारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा सरकार सोमवार, ३० जून रोजी घेणार आहे. अशा परिस्थितीत सरकार या योजनांच्या व्याजदरात बदल करू शकते. या आढाव्यादरम्यान सरकार या योजनांच्या व्याजदरात कपात करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?

आरबीआयनं रेपो दरात कपात केली

या वर्षात आरबीआयने आतापर्यंत ३ वेळा रेपो दरात कपात केली आहे, त्यानंतर रेपो दरात एकूण १ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता बचत योजनेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, सरकारकडून व्याजदरात फारशी कपात केली जाणार नाही. ही कपात २५ ते ५० बेसिस पॉईंट्सपर्यंत असू शकते. आता सरकार ३० जूनला काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही तुमचे पैसे या बचत योजनांमध्ये गुंतवले तर तर यात कपात झाल्यास तुम्हाला तोटा सहन करावा लागू शकतो.

Web Title: interest rates of schemes like PPF SSY might be reduced on June 30 2025 Government likely to take a big decision see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.